भावजयीचा खून;
By admin | Published: May 23, 2014 01:01 AM2014-05-23T01:01:55+5:302014-05-23T01:01:55+5:30
दिरा विरोधात गुन्हा
घाणेगाव : दिराचा आत्महत्येचा प्रयत्न वैराग : बार्शी तालुक्यातील घाणेगाव येथे अनैतिक संबंधास नकार देणार्या भावजयीच्या डोक्यात दगडी पाटा घालून तिचा खून करुन स्वत: विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दीर ब्रह्मदेव बाळू नेटके याच्या विरोधात वैराग पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला. ही घटना मंगळवार, दि. २० मे रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली. २० वर्षांची मयत विवाहित महिला घाणेगाव येथील आपल्या राहत्या घरी झोपली होती. त्यावेळी घरात इतर कोणी नसल्याचे पाहून दीर ब्रह्मदेव बाळू नेटके हा भावजयीशी संबंध प्रस्थापित करण्याच्या हेतूने घरात घुसला. परंतु भावजयीने संबंधास नकार देताच त्याने तिच्या डोक्यात दगडी पाटा घालून जिवे ठार मारले. त्यानंतर स्वत: विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत मयत महिलेच्या वडिलाने वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी आरोपीवर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना २० रोजी घडली असून, वैराग पोलिसांत खुनाचा गुन्हा २२ मे रोजी दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनि राजेंद्र टाकणे हे करीत आहेत.