मोठी बातमी! उजनी धरणाच्या पाण्यात बुडालेल्या त्या सहा जणांचे मृतदेह सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2024 01:11 PM2024-05-23T13:11:20+5:302024-05-23T13:11:54+5:30

भीमा नदी पात्रातून एका बोटीद्वारे बोटच्या चालकासह सात जण निघालेले होते.

bodies of those six people who drowned in the water of ujani dam were found | मोठी बातमी! उजनी धरणाच्या पाण्यात बुडालेल्या त्या सहा जणांचे मृतदेह सापडले

मोठी बातमी! उजनी धरणाच्या पाण्यात बुडालेल्या त्या सहा जणांचे मृतदेह सापडले

नासिर कबीर, करमाळा : भीमा नदी पात्रात बुडालेल्या सहा प्रवाशांचे मृतदेह गुरुवारी सकाळी सापडल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी कुगाव ते काळाशी दरम्यान असलेल्या भीमा नदी पात्रातून एका बोटीद्वारे बोटच्या चालकासह सात जण निघालेले होते.

दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे व नदीतील लाटामुळे बोट बुडाली, त्यातून एक प्रवासी राहुल डोंगरे हे मोठ्या धाडसाने काळाशी गावाच्या काठावर आले तर बोटीतील गौरव धनंजय डोंगरे (वय १६) गोकुळ दत्तात्रय जाधव, कोमल गोकुळ जाधव व त्यांची मुलगी माही व मुलगा गौरव धनंजय डोंगरे, बोट चालक अनुराग अवघडे या सहा जणांना जलसमाधी मिळाली होती. घटना घडल्यानंतर बुधवारी दिवसभर एनडीआरएफ च्या पथकाने दिवसभर शोध मोहीम राबविली. दुर्घटनाग्रस्त बोट शोध मोहिमे दरम्यान सापडली  पण बेपत्ता एकही मृतदेह दिवसभरात हाती लागलेला नव्हता, गुरुवारी सकाळी जाधव कुटुंबियातील पती-पत्नी व दोन मुले बोट चालक या पाच जणांचे  मृतदेह पाण्यात अर्धवट बाहेर पडलेल्या इनामदार वाडयाजवळ पाण्यावर तरंगताना आढळून आले तर त्यानंतर तासाभराने गौरव डोंगरे यांचा मृतदेह एनडीआरएफच्या पथकाला आढळून आला. या सर्व मृतदेहाची उत्तरीय तपासणी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात सकाळी करण्यात आली.

यावेळी उपस्थित असलेले तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी बोलताना सांगितले की, मृतदेहांची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर सदर मृतदेह  कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येतील. उजनी पाणलोट क्षेत्रात दळणवळणासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदा बोटिंगची यापुढे नियमानुसार वाहतुकीचा परवाना बोटीत सुरक्षा सामग्री या  सर्व गोष्टींची पूर्तता पाटबंधारे खाते व महसूल व पोलीस प्रशासनाच्या नियमानुसार करून सुरू करण्यात येतील.

Web Title: bodies of those six people who drowned in the water of ujani dam were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.