बार्शीत मतदान केंद्रावर बोगस मतदान; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 08:06 AM2024-11-21T08:06:32+5:302024-11-21T08:07:04+5:30

तक्रारदार हे मतदान करण्यास गेले असता त्यांच्या नावावर कोणीतरी मतदान करून गेल्याचे तेथील केंद्र प्रमुखांनी सांगितले.

Bogus voting at polling station in Barshi Demand action from the District Collector | बार्शीत मतदान केंद्रावर बोगस मतदान; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

बार्शीत मतदान केंद्रावर बोगस मतदान; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

Barshi Vidhan Sabha ( Marathi News ) :बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बुधवारी मतदानाच्यावेळी गणेश रामचंद्र जाधव (रा. गोकुळ किल्ला बार्शी) यांच्या नावावर बोगस व्यक्तींनी मतदान केल्याने संबंधित व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी बार्शी विधानसभा मतदारसंघ, तहसीलदार बार्शी व शहर पोलिस निरीक्षक यांच्याकडे मागणी केली. 

तक्रारदार गणेश जाधव हे बुधवारी मतदान करण्यासाठी सकाळी ८:३० वाजता गवळे गल्ली येथील केंद्रावर गेले होते. त्यांचे मतदान यादीतील बूथ क्रमांक १०१ मध्ये १०७० या अनुक्रमांकावर नाव असून, त्यावर तक्रारदर यांचा फोटोही असताना तक्रारदार हे मतदान करण्यास गेले असता त्यांच्या नावावर कोणीतरी मतदान करून गेल्याचे तेथील केंद्र प्रमुखांनी सांगितले. त्यानंतर मतदार जाधव यांनी आधार कार्ड दाखविले, शिवाय यादीतील फोटोही व हाताला शाई लावली नसल्याचे दाखवले. 

अधिकाऱ्यांनी दोन्ही आधार कार्डवरील नंबर वेगळे असल्याचे सांगताच त्यामुळे तक्रादाराने मला मतदान करू द्यावे अशी मागणीही केली. तुम्ही असे बोगस मतदान कसे करून घेतले असे म्हणताच केंद्र प्रमुख तुमच्या नावावर मतदान झाले आहे, तुम्ही जावा असे म्हणताच त्यामुळे ओळखपत्राची छाननी करता बोगस मतदान करून घेतल्याने कार्यवाही करून मला मतदान करण्याची संधी मिळावी अशी मागणी केली.

Web Title: Bogus voting at polling station in Barshi Demand action from the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.