महादेव कोळी समाजाला तात्काळ दाखले द्यावेत, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 02:30 PM2017-08-23T14:30:55+5:302017-08-23T14:30:59+5:30
सोलापूर दि २३ : पंढरपूर शहरातील महादेव कोळी समाजाला क्षेत्राचे बंधन घालून अनुसूचित जमातीचे दाखले नाकारता येणार नाही, त्यांना तत्काळ दाखले देण्यात यावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. सोनक व शंतनु केमकर यांच्या खंडपीठाने दिले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : पंढरपूर शहरातील महादेव कोळी समाजाला क्षेत्राचे बंधन घालून अनुसूचित जमातीचे दाखले नाकारता येणार नाही, त्यांना तत्काळ दाखले देण्यात यावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. सोनक व शंतनु केमकर यांच्या खंडपीठाने दिले.
पंढरपुरातील वैशाली चंद्रकांत अधटराव, वर्षा चंद्रकांत अधटराव व अन्य जणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महादेव कोळी समाज हा आदिवासी असून, पंढरपूर किंवा सोलापूर जिल्हा हा आदिवासी क्षेत्रात मोडत नसल्याचे कारण सांगून पंढरपूरच्या उपविभागीय दंडाधिकाºयांनी त्यांना महादेव कोळी अनुसूचित जमातीचे दाखले देण्यास नकार दिला होता. त्यांच्या या आदेशाविरुध्द अधटराव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांच्या वतीने आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ३ मार्च १७ रोजी जयवंत दिलीप पवार विरुध्द महाराष्टÑ शासन या खटल्याचा पुरावा देण्यात आला होता. या निकालामुळे सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी महादेव कोळी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्टÑ कोळी समाज संघटनेचे पश्चिम महाराष्टÑ अध्यक्ष पंचप्पा हुग्गे व मुख्य संघटक लक्ष्मण कोळी, जिल्हाध्यक्ष संजीव कोळी, महिला अध्यक्षा कमलताई ढसाळ, सुरेखा कोळी, भारती कोळी, शहराध्यक्ष गणेश कोळी आदींनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन दाखले त्वरित देण्याची कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.