सोलापुरातील बोगस डॉक्टरांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ, तिघांविरूध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 02:07 PM2018-11-30T14:07:17+5:302018-11-30T14:08:20+5:30
जेलरोड पोलीस ठाणे : तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : साखर पेठेतील इकरार अली मस्जिदसमोर कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना, नागरिकांच्या जीवाशी खेळणाºया तीन डॉक्टरांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री ८ वाजता करण्यात आली.
जुबेर महंमद दंडू, खानसा जुबेर दंडू, फिरोज अलिम दंडू (सर्व रा. ५५४, साखरपेठ, इकरार अली मस्जिदसमोर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जिल्हाधिकाºयांनी इकरार अली मस्जिदजवळ जुबेर दंडू स्कि न स्पेशालिटी यांनी दिलेल्या औषधांमुळे रुग्णाला त्रास होत आहे.
याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे आदेश देण्यात आले होते. यावरून २८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव विठ्ठल सोडल (वय ६०) सोबत महिला कर्मचाºयास घेऊन स्किन स्पेशालिटीमध्ये गेले. तेथे असलेल्या खानसा दंडू यांना चेहºयावरील डागावर औषध देण्याची मागणी केली. खानसा दंडू यांनी चेहरा पाहून चिठ्ठीवर अॅलोपॅथीची गोळी लिहून दिली.
खानसा दंडू यांना डॉ. नामदेव सोडल यांनी नाव, गाव पत्ता विचारला असता त्यांनी मी बी.ए.एम.एस. डॉक्टर असून माझे शिक्षण विजापुरात झाले आहे, असे सांगितले. डॉ. जुबेर दंडू कुठे आहेत, असे विचारले असता त्यांनी ते माझे पती आहेत, त्यांचा एम.बी.बी.एस.चं शिक्षण पूर्ण झालं असून ते एम.डी. पदवीसाठी पुणे येथे गेल्याचे सांगितले. डॉ. नामदेव सोडल यांनी महिलेकडे प्रमाणपत्राची मागणी केली तेव्हा मी डॉक्टर नसून माझे पती असल्याचे सांगितले. दरम्यान, तेथे फिरोज महंमदअली दंडू हे तेथे आले. त्यांनी हा दवाखाना मी स्वत: चालवित असल्याचे सांगितले.
माझ्याकडे हर्बल हॉस्मेटिकचा परवाना आहे, असे सांगितले. या दरम्यान पुन्हा एक इसम आला. त्याने स्वत:चे नाव जुबेर दंडू असे सांगितले. त्यांनी मी व्ही.एम. मेडिकल कॉलेज येथे एम.बी.बी.एस.च्या दुसºया वर्गात शिकत असल्याचे सांगितले. कागदपत्रांची मागणी केली असता त्यांना देता आली नाही. त्यामुळे तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास महिला फौजदार जाधव करीत आहेत.