मोहोळ तालुक्यात १५ वाचनालयांना ग्रंथ भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:22 AM2021-04-04T04:22:30+5:302021-04-04T04:22:30+5:30
यामध्ये व्यापारी वाचनालय, मोहोळ -५७८ ग्रंथ, कै. शहाजीराव शं. पाटील, वाचनालय नरखेड -३८७ ग्रंथ, सूरज वाचनालय, ढोकबाभुळगाव ३८७, ...
यामध्ये व्यापारी वाचनालय, मोहोळ -५७८ ग्रंथ, कै. शहाजीराव शं. पाटील, वाचनालय नरखेड -३८७ ग्रंथ, सूरज वाचनालय, ढोकबाभुळगाव ३८७, ज्ञानोबा कादे वाचनालय, वाळूज ३८७, जयकिसान वाचनालय म. चौधरी, ३८७ ग्रंथ, महालक्ष्मी वाचनालय इंचगाव - ३८७, संत तुकाराम वाचनालय सोहोळे - ३८७, स्वामी समर्थ वाचनालय कामती - ३८७, श्रीहरी वाचनालय वडाचीवाडी - ३८७, प्रथमेश वाचनालय न. पिंपरी - ३०९, संध्या छाया वाचनालय मोहोळ - ३०९, मनोहर डोंगरे वाचनालय हराळवाडी - १५४, प्रियदर्शनी वाचनालय मोहोळ - १५४, लोकनेते बाबूराव पाटील वाचनालय, भांबेवाडी - १५४, शिवप्रभू वाचनालय पोफळी - १५४ अशा तालुक्यांतील १५ वाचनालयास ११ लाख २० हजार रुपये किमतीचे एकूण ४९१० ग्रंथ आमदार वजाहत मिर्झा व आ. निलय नाईक यांच्या फंडातून देण्यात आली.
यासाठी जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक विजयकुमार पवार यांचे सहकार्य लाभले. वरील ग्रंथालयास भास्कर कुंभार, दिलीप देशपांडे यांच्या हस्ते ग्रंथभेट देण्यात आली.
यावेळी सुशांत कादे, भास्कर कुंभार, दिलीप देशपांडे, हणमंत पवार, उत्तम मेटकरी गजानन झेंडगे, जनाबाई शिंदे, चरण शेळके, दादा गायकवाड, गो. रा. कुंभार, शहाजान बागवान, गणेश हावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
---
ग्रंथ सुपूर्द करताना जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक भास्कर कुंभार, मोहोळ व्यापारी
वाचनालयाचे ग्रंथपाल दिलीप देशपांडे.