सोलापुरात सातशे चारचाकी अन् २५०० दुचाकींच बुकिंग, ८० कोटींच्या उलाढालीची शक्यता
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 21, 2023 17:58 IST2023-03-21T17:57:50+5:302023-03-21T17:58:02+5:30
गुढीपाडव्यानिमित्त शुभ मुहूर्त साधून अनेकजण वाहन खरेदी करीत आहेत.

सोलापुरात सातशे चारचाकी अन् २५०० दुचाकींच बुकिंग, ८० कोटींच्या उलाढालीची शक्यता
सोलापूर : गुढीपाडव्यानिमित्त शुभ मुहूर्त साधून अनेकजण वाहन खरेदी करीत आहेत. पाडव्यानिमित्त शहर व ग्रामीण भागातील ऑटोमोबाइल्स शोरूममध्ये सातशे चारचाकी अन् अडीच हजार दुचाकी वाहनांची बुकिंग झाली आहे. चार चाकी वाहनांच्या विक्रीतून साधारण ५० कोटींच्या उलाढालीची शक्यता आहे. तसेच दुचाकी वाहनांच्या विक्रीतून ३० कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. एकूण ८० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
गुढीपाडवा दिनाचे औचित्य साधून अनेकजण खरेदीला बाहेर पडतात. सोने-चांदी तसेच वाहन खरेदीला ग्राहक प्राधान्य देतात. गुढीपाडव्याच्या दिनी घरासमोर नवीन वाहन आणण्यासाठी ग्राहक मागील पंधरा दिवसांपासून ऑटोमोबाइल्स शोरूमला चकरा मारत आहेत. आवडत्या वाहनांची बुकिंग करण्यासाठी धडपडत आहेत. ऑटोमोबाइल्स व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार, २१ मार्चअखेर सातशेहून अधिक चारचाकी वाहनांची बुकिंग झाली आहे. तसेच अडीच हजार दुचाकी वाहनांची देखील बुकिंग झाली आहे. यात पंधरा टक्के ई-बाईक्सचा समावेश आहे.