विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी; घरी बसूनच करता येणार विठ्ठलाच्या पूजेचे बुकिंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 09:12 AM2024-08-29T09:12:48+5:302024-08-29T09:13:18+5:30
राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविकाला घरबसल्या देवाची पूजा बुकिंग करता येणार असल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या देवाच्या पूजेची संधी राज्यातील गोरगरीब भाविकांनाही उपलब्ध व्हावी, पूजा बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता असावी, यासाठी मंदिर समितीकडून सप्टेंबरअखेर ऑनलाइन पूजा बुकिंग सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविकाला घरबसल्या देवाची पूजा बुकिंग करता येणार असल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
दररोज विठ्ठलाच्या दोन व रुक्मिणीच्या दोन नित्यपूजा व १० पाद्यपूजा असतात. त्याचबरोबर नैवेद्य, पोशाख व धुपारती अशा तीन वेळा १५ प्रमाणे एका दिवसात ४५ तुळशी पूजा होतात.