अक्कलकोटमधील कोविड सेंटर रुग्णांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:21 AM2021-05-10T04:21:41+5:302021-05-10T04:21:41+5:30

अक्कलकोट येथे कोरोनावर उपचार करणारे एकही हॉस्पिटल नव्हते. यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. यामुळे गत वर्षभरापासून मोफत हॉस्पिटल सुरू ...

A boon for Kovid Center patients in Akkalkot | अक्कलकोटमधील कोविड सेंटर रुग्णांसाठी वरदान

अक्कलकोटमधील कोविड सेंटर रुग्णांसाठी वरदान

Next

अक्कलकोट येथे कोरोनावर उपचार करणारे एकही हॉस्पिटल नव्हते. यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. यामुळे गत वर्षभरापासून मोफत हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आ. सचिन कल्याणशेट्टी हे प्रयत्नशील होते. सर्व काही तयारी पूर्ण असूनही केवळ मनुष्यबळाअभावी ते रखडले होते; परंतु आता काही शासकीय तर काही खासगी मनुष्यबळ उपलब्ध करून कोविड सेंटर सुरू केले. शहरात सोय नसल्याने प्रत्येक सिरिअस रुग्ण थेट सोलापूर येथे जात होते. त्या ठिकाणी वेळेवर बेड उपलब्ध होत नसल्याने परिणामी रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले होते. गतवर्षीपेक्षा यंदा सर्रास रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता होती. तेच याठिकाणी उपलब्ध करून दिल्याने सोलापूरला जाणाऱ्या रुग्णांमध्ये घट झाली. यामुळे सोलापूरचाही भार कमी झाला आहे.

रुग्णसेवेसाठी अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. निखिल क्षीरसागर, डॉ. धनाप्पा हरमनी, डॉ. काशीनाथ हालकुडे, डॉ. श्रीकांत मडचणे, यांच्यासह कर्मचारी सागर डुमडे, सुप्रिया पवार, प्रज्ञा कांबळे, पूजा पाटील, आदर्श वाघमारे, महांतव्वा म्हेत्रे, संगीता कोकणे, संतोष मागडे, श्रीमंत मोरे, पुंडलिक लोकरे, आकाश रणखांबे हे परिश्रम घेत आहेत. यामध्ये काही मोजके शासकीय कर्मचारी असून उर्वरित खासगी कर्मचारी उपलब्ध करून हे सेंटर आ. कल्याणशेट्टी यांनी सुरळीतपणे सुरू ठेवले आहे. विशेषतः सर्व कर्मचाऱ्यांची दोन्ही लस पूर्ण करून घेतले आहेत.

आमदारांकडून रुग्णांची आस्थेने चौकशी

आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रयत्न करून डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू केले. या हॉस्पिटलमध्ये येऊन ते रोज किमान एक तास येऊन अडीअडचणी जाणून घेऊन रुग्णांची आस्थेने चौकशी करतात. काही समस्या असेल तर तात्काळ दूर करतात, असे सांगण्यात आले.

Web Title: A boon for Kovid Center patients in Akkalkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.