बोरगाव ग्रामपंचायतीचा सीसीटीव्ही कॅमेरा ठरला लोकोपयोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:21 AM2021-04-15T04:21:18+5:302021-04-15T04:21:18+5:30
तालुक्यात सीसीटीव्ही यंत्रणा राबवणारी पहिली ग्रामपंचायत बोरगाव आहे. या गावात ९ एप्रिल रोजी एका युवकाचा मोबाइल ग्रामपंचायत कार्यालय परिसरात ...
तालुक्यात सीसीटीव्ही यंत्रणा राबवणारी पहिली ग्रामपंचायत बोरगाव आहे. या गावात ९ एप्रिल रोजी एका युवकाचा मोबाइल ग्रामपंचायत कार्यालय परिसरात चोरीला गेला होता. याबाबतची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली असता फुटेज तपासले असता मोबाइलचा शोध लागला.
बोरगाव येथील बबलू पठाण हा महाविद्यालयीन विद्यार्थी मोबाइलद्वारे शिक्षणविषयक अभ्यासक्रमातील व्हिडिओ पाहून झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील अंगणवाडी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर झोपी गेला. पहाटे ३.३० वाजता उशाला ठेवलेला मोबाइल चोरीला गेल्याचे फुटेजद्वारे दिसून आले. या विद्यार्थ्याला तो मोबाइल सरपंच विलासराव सुरवसे यांच्या हस्ते देण्यात आला. चोरीला गेलेला मोबाइल सापडल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याची उपयुक्तता लक्षात घेऊन सरपंच विलासराव सुरवसे आणि ग्रामपंचायत टीमने ही यंत्रणा कार्यान्वित केली. पठाण कुटुंबीयाकडून सरपंच, ग्रामपंचायत टीम व या यंत्रणेचे तांत्रिक तज्ज्ञ इब्राहिम कारंजे यांनी तत्परतेने फुटेज काढून सहकार्य केल्याबद्दल कौतुक केले.
यावेळी उपसरपंच राजेभाई मुजावर, ग्रामसेवक लक्ष्मण भैरामडगी, विजयकुमार खोबरे, संतोष सुरवसे , प्रा. मनोज जगताप, प्रा. प्रकाश सुरवसे, महादेव पवार, सुनील सुरवसे, मकबूल पठाण, ग्रामपंचायत सदस्य, अपंग क्रांती संघटना नेते वाहिद पठाण, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन जिरगे, भागेश जिरगे, विठ्ठल कोळी, गुंडू बागवान उपस्थित होते.
गाव बनले सुरक्षित
बोरगावचे सरपंच विलास सुरवसे यांनी ग्रामपंचायतच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे माझ्या मुलाचा मोबाइल सापडला. या यंत्रणेमुळे गावातील प्रमुख चार चौक आणि प्रवेशद्वार सुरक्षित बनले आहेत. गावातील सर्व लोक, महिला वर्ग, सर्व स्तरातील लोकांकडून समाधान व्यक्त होत आहे. या यंत्रणेमुळे आमच्या कुटुंबातील विद्यार्थ्याचा महागड्या मोबाइलचा शोध लागल्याने त्याचे ऑनलाइन शिक्षण सुरू राहिले आहे. याबद्दल मी ग्रामपंचायत सरपंच व संपूर्ण टीमचा आभारी असल्याचे रब्बानी पठाण यांनी सांगितले.