दोघांना जेरबंद करून १९ दुचाकी गाड्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:48 AM2020-12-11T04:48:36+5:302020-12-11T04:48:36+5:30
गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यामुळे गुन्हे अन्वेषण विभागाने २९ नोव्हेंबर रोजी विठ्ठल हनुमंत चौगुले (वय ३५, रा.भोसे) यास ताब्यात घेतले. ...
गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यामुळे गुन्हे अन्वेषण विभागाने २९ नोव्हेंबर रोजी विठ्ठल हनुमंत चौगुले (वय ३५, रा.भोसे) यास ताब्यात घेतले. चौगुलेची चौकशी केली असता नामदेव बबन चुनाडे (वय ४८, रा. अनिलनगर) या साथीदाराबरोबर आपण १९ दुचाकी गाड्या चोरल्याची त्याने कबुली दिली. पोलिसांनी दोघांनाही जेरबंद केले असून, त्यांच्याकडून १९ गाड्या ताब्यात घेतल्या.
ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गाडेकर, हवालदार सूरज हेंबाडे, गणेश पवार, इरफान शेख, शोएब पठाण, प्रसाद ओटी, सिद्धनाथ मोरे, संजय गुटाळ, हवालदार जाधव, समाधान माने, अन्वर आतार यांनी केली. पुढील तपास पोलीस नाईक प्रसाद आवटी हे करीत आहेत.
फोटो
१०पंढरपूर क्राईम
ओळी
१९ मोटारसायकली जप्त केल्यानंतर आरोपीसह उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर व अन्य पोलीस.