क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:47 IST2025-03-26T16:47:25+5:302025-03-26T16:47:44+5:30
विहिरीच्या कडेला हरवलेला चेंडू शोधताना पाय घसरून तो खोल विहिरीत पडला.

क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू
भंडारकवठे/सोलापूर : कंदलगाव -निंबर्गी रोडवर हरीश सप्ताळे यांच्या शेतात असलेल्या विहिरीलगत क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलाचा विहिरीत पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सुमारास ही कंदलगाव सायंकाळी पाचच्या येथे ही घटना घडली. ओमकार चव्हाण (वय १५) असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे.
ओमकार हा नुकतीच दहावीची परीक्षा देऊन आई-वडिलांकडे आला होता. तो पाच वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. विहिरीच्या कडेला हरवलेला चेंडू शोधताना पाय घसरून तो खोल विहिरीत पडला, त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, मंद्रूप पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मनगोळी येथील भोई समाजाचे तरुण कमलाकर डिरे, अनिल सले, अजय नगरे, हर्षद कांबळे, फारुख नदाफ यांच्या मदतीने रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेचा तपास मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विक्रम माने, महेश कोळी पुढील तपास करत आहेत.