वडिलाच्या अंत्यविधीसाठी मुलगा तीन तास जेलबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:23 AM2021-07-30T04:23:57+5:302021-07-30T04:23:57+5:30
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे कामगारांसाठी असलेली कुर्डुवाडी - मिरज ही रेल्वे गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पंढरपुरातील सरगम चौकातील रेल्वे ...
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे कामगारांसाठी असलेली कुर्डुवाडी - मिरज ही रेल्वे गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पंढरपुरातील सरगम चौकातील रेल्वे मार्गावरून जात होती. यावेळी सुदेश शामराव पवार (वय ४८, रा. कडबे गल्ली, पंढरपूर) हे सरगम चौकाकडे चालले होते. या दरम्यान त्यांना रेल्वेची धडक बसली व त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. यामुळे त्यांचा जागीच मृृत्यू झाला. ही बातमी समजताच रेल्वे पोलीस हवालदार संजय चिटणीस त्या ठिकाणी पोहचले. त्यानंतर सुदेश पवार यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पंढरपूर शहर पोेलीस ठाण्यामध्ये आकाश सुदेश पवार पंढरपूर तहसील कार्यालयातील सबजेलमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. त्याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला, यामुळे त्याला प्रथम वर्ग न्यायालयाने वडिलांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी गुरुवारी ३ तासांची परवानगी दिली होती. त्याच्याबरोबर अंत्यविधीसाठी जाण्यासाठी हवालदार ताजुद्दीन मुजावर, पोलीस विलास अलदर, शिवाजी खटकाळे, लोखंडे यांच्या पथकास सोबत दिली होती.