कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापुजेवर मंदिर समितीच्या सदस्याचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 08:10 PM2020-11-24T20:10:45+5:302020-11-24T20:11:14+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पाठवले आहे. त्यासाठी सर्व वारकऱ्यांनी खूप प्रयत्न केले आहे. त्या वारकऱ्यांनाच कार्तिकी एकादशीला येता येणार नाही. त्यामुळे मी ही कार्तिकी एकादशीनिमित्त होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापुजेस न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र मंदिर समितीच्या माधवी निगडे यांनी दिले आहे.
वारकऱ्यांनी २०१७ च्या आषाढीला वाखरी येथे पालखी सोहळा शासनाने वारकरी प्रतिनिधी समिती वर नेमावे याकरता आडवला होता त्यानंतर बंडातात्या कराडकर व राजाभाऊ चोपदार व अनेक सहकाऱ्यांनी महाराष्ट्रभर फिरुन वारकरी एकीचे वातावरण करुन एक आंदोलन उभे केले. यामुळे मला व इतरांना हे पद वारकरी प्रतिनिधी म्हणुन मिळाले.
आजच्या कोविड काळात समस्त वारकरी हे चैत्र, आषाढी कार्तिकीला मुकले आहेत मी ही पायी वारी केली असल्याने दर्शनापेक्षा ही भजन, नगरप्रदक्षिणा, चंद्रभागे स्नान याचे सुख उपभोगले आहे त्यामुळेच सर्व वारकऱ्यांची खंत आज जाणवत आहे. या मानसिकतेतुन वरील दोन्ही महापुजसे हजर राहुन त्यांचा आनंद घेणे. माझ्या नैतिकेला पटणारा नाही केवळ सोशल मिडीया वर मत व्यक्त करण्याने काही होत नाही. तर सर्वसमावेशक व समर्थ आणि शासनाशी योग्य तो समन्वय साधणाऱ्या वारकरी संप्रदायातील नेतृत्वाची पोकळी जाणवत आहे. एक सामान्य वारकरी म्हणुन मी फक्त ज्या वारकऱ्यांनी पालखी सोहळा अडवुन आम्हांला पद दिले त्यांची नैतिक दृष्टीकोनातुन मी इतकेच उतराई होऊ शकते. माझा कोणत्याही संघटना, राजकीय पक्ष यांना पाठींबा व विरोधही नाही. असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे मंदिर समितीच्या माधवी निगडे यांनी सांगितले आहे.