करमाळा तालुक्यातील रिटेवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 02:49 PM2019-04-23T14:49:17+5:302019-04-23T14:50:24+5:30
मुलभूत सेवासुविधा न मिळाल्याने घेतला निर्णय; दुपारपर्यंत एक टक्काही मतदान नोंदले गेले नाही
करमाळा : मुलभूत सेवासुविधांपासून वंचित असलेल्या रिटेवाडी (ता़ करमाळा) येथील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला़ दुपारी एक वाजेपर्यंत एक ही मत मशिन मध्ये नोंदले गेले नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
दरम्यान, करमाळा तालुक्यातील रिटेवाडी गावचा १९७६ साली पुनर्वसन झाले आहे़ त्या सालापासून रिटेवाडी ग्रामस्थांना एसटीची सोय नाही, कोणत्याही शाळेची सोय नाही, आरोग्याची व्यवस्था नाही, लाईट नाही, गाव विकासासाठी लागणाºया सेवासुविधा नाही, शासनाच्या योजनांचा एक टक्काही गावाला फायदा झालेला नाही़ जोपर्यंत गावात सेवासुविधा व शासनाच्या योजनांमधून विकास होत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार २३ एप्रिल रोजी मतदानास सुरूवात झाली़ सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या़ दुपारपर्यंत ३१ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकाºयांनी दिली.