सोलापूरची पोरं हुशार; सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के...!
By Appasaheb.patil | Published: July 16, 2020 01:21 PM2020-07-16T13:21:41+5:302020-07-16T13:21:55+5:30
यंदाही मुलींची बाजी; ५० हजार १७८ विद्यार्थी उत्तीर्ण
सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल गुरूवारी दुपारी १ वाजता आॅनलाइन पध्दतीने जाहीर करण्यात आला. यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के इतका लागला आहे.
बारावीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुके व शहरातून कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेतून ५३ हजार ७४० विद्यार्थी परीक्षेस बसले होते़ त्यापैकी ५० हजार १७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात अ श्रेणीतून २३ हजार ९०४, ब श्रेणीतून १९ हजार ४०४ विद्यार्थ्यानी यश मिळविले आहे.
तालुकानिहाय निकाल
- अक्कलकोट : 90.70%
- बार्शी : 93.81%
- करमाळा : 89.62%
- माढा : 95.09%
- माळशिरस : 92.40%
- मंगळवेढा : 97.30%
- मोहोळ : 95.62%
- पंढरपूर : 95.36%
- उत्तर सोलापूर : 92.92%
- सांगोला : 95.70%