Breaking; आषाढी एकादशी सोहळा; पंढरपुरात संचारबंदी, तरीही शहरात सर्वत्र गर्दीच गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 02:08 PM2021-07-20T14:08:52+5:302021-07-20T14:09:55+5:30
भाविकांबरोबरच पोलिस, होमगार्ड सेल्फी घेण्यात व्यस्त
पंढरपूर : आषाढी एकादशी निमित्त गर्दी होऊ नये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंढरपूर शहर व गावात संचारबंदी करण्यात आले आहे. आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे नियोजन कोलमडल्याचे दिसून आले.
आषाढी यात्रेच्या दरम्यान कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी १७ जुलै ते २५ जुलै अशी संचारबंदी करण्याबाबत आदेश आले होते. मात्र संचारबंदीचा कालावधी कमी करावा अशी मागणी अनेक लोकांमधून होत होती. त्यानुसार पंंढरपूर तालुक्यातील ९ गावातील संचारबंदीचा कालावधी आता १८ जुलै ते २२ जुलै असा चार दिवसांचा करण्यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी काढले आहेत.
यासाठी पंढरपूर शहर, व तालुका, जिल्हा हद्दीपर्यंत त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात आली आहे. तरीही आषाढी एकादशी सोहळा दिवशी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली. त्याचबरोबर बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी होमगार्ड यांनी देखील सेल्फी घेण्यासाठी से विठ्ठलाच्या नामदेव पायरीसमोर गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र बंदोबस्तासाठी असलेले पोलीस हातावर हात धरून बसल्याचे दिसून आले. यामुळे प्रशासनाने संचारबंदीचे नियोजन फक्त कागदावरच केल्याचे दिसून आले.