Breaking; करमाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे अतुल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:03 PM2021-07-09T16:03:59+5:302021-07-09T16:04:22+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
करमाळा : करमाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी अतुल पाटील यांची अखेर बिनविरोध निवड झाली आहे. १ जुलैला पंचायत समितीच्या सभापतीची निवड जाहीर झाली होती. मात्र नोटीस न मिळाल्याच्या कारणावरून पोथरे गणातील सदस्य ॲड. राहुल सावंत यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर तहसीलदार समीर माने यांनी शुक्रवारी (ता.९) निवडीची बैठक बोलावली होती.
करमाळा पंचायत समिती मध्ये शिवसेने चे माजी आमदार नारायण पाटील यांची एक हाती सत्ता आहे. गहिनीनाथ ननवरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पंचायत समितीचे सभापती पद रिक्त झाले होते. निवडी दरम्यान सावंत यांच्याकडून काही वेगळा चमत्कार होणार का? अशी चर्चा होती. मात्र निवडी दरम्यान काहीही चमत्कार झालेला नाही. पाटील यांचा एकमेव अर्ज आला आणि त्यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. निवडी दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.