Breaking; सोलापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू; दीड वाजेपर्यंत झाले ५०.१६ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 03:37 PM2021-01-15T15:37:09+5:302021-01-15T15:37:41+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर : जिल्ह्यातील ५९० ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. ५९० ग्रामपंचायतींमध्ये एकूण १२,२२५ उमेदवार आपली राजकीय शक्तीपणाला लावली आहे. यातूनच ५९० गावकारभारी प्रथम सदस्य म्हणून निवडून येणार आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत ५०.१६ टक्के मतदान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.
मतदानप्रक्रिया शांत आणि निपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. एकूण १८ हजार अधिकारी व कर्मचारी याकरिता परिश्रम घेत आहेत. एकूण २,२९६ प्रभागात निवडणूक होत आहे. यात ३ हजार ४७५ महिला उमेदवारदेखील महिला शक्तीचा जोर आजमावत आहेत.
तालुकानिहाय झालेले मतदान असे...(०१.३० वाजेपर्यंत)
करमाळा - ५२.१७ टक्के
माढा - ५०.८४ टक्के
बार्शी - ४९.९० टक्के
उत्तर सोलापूर - ५२.१२ टक्के
मोहोळ - ४०.६९ टक्के
पंढरपूर - ५१.६५ टक्के
माळशिरस - ४६.७० टक्के
सांगोला - ५४.७३ टक्के
मंगळवेढा - ५१.३९ टक्के
दक्षिण सोलापूर - ५२.५४ टक्के
अक्कलकोट - ५१.१९टक्के
एकूण -५०.१६ टक्के