Breaking; मुख्यमंत्री स्वत:च गाडी चालविणार; पंढरपुरात दुपारनंतर दाखल होणार

By appasaheb.patil | Published: July 19, 2021 12:52 PM2021-07-19T12:52:23+5:302021-07-19T12:56:31+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Breaking; Corona travels without a driver; The Chief Minister will arrive in Pandharpur in the afternoon | Breaking; मुख्यमंत्री स्वत:च गाडी चालविणार; पंढरपुरात दुपारनंतर दाखल होणार

Breaking; मुख्यमंत्री स्वत:च गाडी चालविणार; पंढरपुरात दुपारनंतर दाखल होणार

Next

सोलापूर - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सपत्नीक मुंबईहून वाहनाने पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. उद्या मंगळवारी आषाढी एकादशी असल्याने पंढरपुरातील मंदिरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी ते उपस्थित राहणार आहेत. कोरोनामुळे ते स्वत: गाडी चालवित पंढरपुरात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मु्ंबईतून स्वतः गाडी चालवत पंढरपूरात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. . ८ ते ९ तास गाडी चालवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रात्री सात ते आठच्या सुमारास पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा पार पडणार आहे. 

कोरोनामुळे ड्रायव्हर विना प्रवास

राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगची सक्ती सुरू आहे. प्रवासातही ठराविक प्रवाशांच मूभा देण्यात आली आहे. कोरोनाच्या सुरूवातीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतःच गाडी चालवत मंत्रालय आणि इतर भेटींच्या ठिकाणी जाताना दिसून आलं. मंत्रालयात होणाऱ्या बैठकांनाही मुख्यमंत्री स्वतःच गाडी चालवत हजर राहतात. मे मध्ये आमदारकीची शपथ घेतली. त्यावेळी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आले होते. त्यावेळीही ते स्वतः गाडी चालवत असल्याचं बघायला मिळालं होतं. मागील वर्षीही मुख्यमंत्री हे स्वत- गाडी चालवित पंढरपुरात दाखल झाले होते.

Web Title: Breaking; Corona travels without a driver; The Chief Minister will arrive in Pandharpur in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.