Breaking; ऊसाच्या फडात गांजाची लागवड; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

By Appasaheb.patil | Published: July 22, 2022 10:31 AM2022-07-22T10:31:40+5:302022-07-22T10:31:47+5:30

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

Breaking; Cultivation of cannabis in sugar cane; Four and a half lakh worth of goods seized | Breaking; ऊसाच्या फडात गांजाची लागवड; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

Breaking; ऊसाच्या फडात गांजाची लागवड; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

Next

सोलापूर : वटवटे (ता. मोहोळ) येथील एका शेतातील ऊसाच्या पिकामध्ये केलेली गांजाची लागवड पोलिसांनी उघडकीस आणली. पोलिसांच्या कारवाईत ४.१३ किलो वजनाचे गांजासह एकूण ४ लाख ४१ हजार ३०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. 

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना सोलापूर जिल्हयात अंमली पदार्थ विरोधी विषेश मोहिम राबवून कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि अनिल सनगल्ले यांचे विशेष पथक नेमूण सदर पथकास कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
सपोनि अनिल सनगल्ले व त्यांचे पथक कार्यालयात हजर असताना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, मौजे वटवटे (ता. मोहोळ जि. सोलापूर) येथील शेतकरी आपल्या शेतातील ऊसाच्या पिकामध्ये गांजा सदृष्य वनस्पतीची लागवड केले असलेबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या बातमी प्रमाणे कारवाई करण्याकरिता वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सपोनि अनिल सनगल्ले व त्यांचे पथक कारवाई करणेकामी कामती पोलीस ठाणे येथे जावून तेथील प्रभारी अधिकारी सपोनि अंकुश माने व कामती पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार यांची मदत घेवून  कारवाई करणेकरीता बातमीचे नमूद ठिकाणी नायब तहसिलदार लिना खरात, दोन शासकीय पंच, फोटोग्राफर, वजनकाटा असे वाहनासह जावून बातमीप्रमाणे शेतातील ऊसामध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार यांचेसह पाहणी केली असता शेतातील ऊसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी लहान मोठी गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. त्यावरून मिळून आलेली झाडे ही गांजा सदृश्य वनस्पती असल्याचे खात्री झाल्याने सदरची झाडे मुळासह उपटून काढून त्याचे सोबत आणलेल्या वजनकाटयामध्ये वजन केले असता ४५.१३० किलो वजनाचे ४,४१,३०० रू. किंमतीचे गांजा सदृश्य वनस्पती मिळून आले.

अंमली पदार्थ गुन्हयाचेकामी कामती पोलीस ठाणेचे सपोनि अंकुश माने यांनी जप्त करून कारवाई केली आहे. सदरबाबत कामती पोलीस ठाणे येथे गुरंन 195/2022, अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हयाचा तपास कामती पोलीस ठाणेचे सपोनि अंकुश माने हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली कामती पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक अंकुश माने, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस  निरीक्षक अनिल सनगल्ले, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, मोहिनी भोगे, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख, कामती पोलीस ठाणेचे बापूसाहेब दुधे, चंद्रकांत कदम, सचिन जाधवर, अमोल नायकोडे, परमेश्वर जाधव, भरत चैधरी यांनी बजावली आहे.

Web Title: Breaking; Cultivation of cannabis in sugar cane; Four and a half lakh worth of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.