Breaking; दामाजी कारखान्यांच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनपदाची २६ जुलैला निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 15:47 IST2022-07-20T15:46:38+5:302022-07-20T15:47:18+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; दामाजी कारखान्यांच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनपदाची २६ जुलैला निवड
मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखे
दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड मंगळवार दि. २६ जुलै २०२२ रोजी दुपारी ११ वाजता प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. याबाबत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान समविचारी आघाडी पॅनल मधून शिवानंद पाटील यांचे नाव चेअरमनपदासाठी जवळपास निश्चित झाले असून औपचारिक घोषणा करणे बाकी आहे मात्र व्हा चेअरमनपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी संचालकांची बैठक आयोजित करावी, अशी सूचना कार्यकारी संचालक यांनी दिली आहे.त्यानुसार निवडून आलेल्या संचालकांना अजेंडा बजावण्यात आला आहे.या प्रक्रियाअंतर्गत निवडून आलेल्या सदस्यांची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
त्याअन्वये नवनिर्वाचित सदस्यांमधून पदाधिकारी निवड करणेसाठी दि.२६ रोजी सकाळी ११ वा. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब समिदर यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली आहे. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी नामनिर्देशन पत्रे अध्यासी अधिकारी यांचेकडे सादर करणे ११ ते ११.३० पर्यत, अध्यासी अधिकारी यांचेकडील प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी करणे ११.३० ते ११.४० पर्यत, नामनिर्देशन पत्र मागे घेणे ११.४० ते १२ पर्यत, उमेदवारी मागे घेतल्यानंतर नामनिर्देशन पत्र एकच शिल्लक राहिल्यास चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची अविरोध निवड जाहीर करणे असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती निवासी नायब तहसीलदार पंकज राठोड यांनी दिली.