Breaking; गणपतराव देशमुखांवर आज सांगोल्यात होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 08:03 AM2021-07-31T08:03:20+5:302021-07-31T08:06:38+5:30
Breaking; गणपतराव देशमुखांवर आज सांगोल्यात होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सांगोला/सोलापूर : महाराष्ट्र विधानसभेतील सांगोल्याचे माजी आमदार शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे पार्थिव शनिवारी सकाळी ६:३० वाजता सोलापूर येथून मोहोळ मार्गे त्याच्या मूळ गावी सकाळी ८ वा. पेनूरला आणण्यात येईल.
त्या ठिकाणी त्यांचे पार्थिव अर्धा तास अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तेथून पंढरपूरमार्गे सकाळी ९ वा सांगोल्यात आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सांगोला पंचायत समिती, कचेरी रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, जय भवानी चौक, सांगोला नगरपरिषद समोरून, चौक नेहरू चौक, स्टेशन रोडने त्यांच्या निवासस्थानी सकाळी १० वा. पोहोचेल तेथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल, तेथून महात्मा फुले चौक मिरज रोडने सांगोला येथील शेतकरी सूतगिरणीवर अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.
दुपारी १ च्या दरम्यान भाई गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येतील असे शेकाप पक्षाचे चिटणीस भाई विठ्ठलराव शिंदे सर माजी सभापती बाळासाहेब काटकर यांनी सांगितले.