Breaking; सुवर्णपदक विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 05:27 PM2021-08-26T17:27:31+5:302021-08-26T17:51:15+5:30

एकाच परिवारात तीन-तीन महाराष्ट्र केसरी गदा पटकाविणारे राज्यातील पहिलेच कुटुुंब.

Breaking; Gold medal winner Maharashtra Kesari wrestler Appalal Sheikh passes away | Breaking; सुवर्णपदक विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख यांचे निधन

Breaking; सुवर्णपदक विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख यांचे निधन

googlenewsNext

सोलापूर -  राष्ट्रकुल स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते महाराष्ट्र केसरी पै.आप्पालाल शेख यांचे अल्पशा आजाराने गुरूवारी सायंकाळी चारच्या सुमारास निधन झाले. 

पैलवान आप्पालाल शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील रहिवासी आहे. त्यांचे बंधू इस्माईल शेख हे देखील पैलवान होते. इस्माईल यांनी कुस्तीच्या सरावासाठी कोल्हापूर गाठलं. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून आप्पालाल देखील कोल्हापूरला गेले. तिथे त्यांना देखील कुस्तीची आवड निर्माण झाली. 1980 साली आप्पालाल यांचे बंधू इ्स्माईल यांनी महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.

भावाचा वारसा पुढे नेत पुढे 1992 साली आप्पालाल देखील महाराष्ट्र केसरी झाले. त्याआधी अनेक छोट्या मोठ्या कुस्त्या आप्पालाल यांनी लढल्या. बल्गेरिया आणि इराण येथे झालेल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी देखील आप्पालाल यांची निवड झाली. त्यात त्यांना यश आले नाही. मात्र 1991 साली न्युझिलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत आप्पालाल यांनी भारतासाठी सुवर्ण पदक देखील पटकावलं. आप्पालाल यांचे पुतण्या मुन्नालाल शेख यांनी देखील 2002 साली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. एकाच परिवारात तीन-तीन महाराष्ट्र केसरी आहेत.


 

 

Web Title: Breaking; Gold medal winner Maharashtra Kesari wrestler Appalal Sheikh passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.