Breaking; पायी चालत जात असलेल्या पान टपरी चालकाला ट्रॅव्हल्सने उडविले; मंगळवेढ्यातील घटना
By Appasaheb.patil | Updated: October 6, 2022 16:06 IST2022-10-06T16:06:17+5:302022-10-06T16:06:20+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; पायी चालत जात असलेल्या पान टपरी चालकाला ट्रॅव्हल्सने उडविले; मंगळवेढ्यातील घटना
मंगळवेढा : मंगळवेढा शहरात ट्रॅव्हल्सने पायी चालत चाललेल्या युवकाला चिरडले असून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आहे. ही घटना गुरूवार ६ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस चौकीच्या शेजारी व हॉटेल राजयोगच्या समोर घडली.
रेवनसिध्द उर्फ दयानंद शिवाजी मोटे (वय ३४, रा.नंदेश्वर ता. मंगळवेढा) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रोडच्या कडेला गाडी लावून चालत जात असताना पंढरपूरकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सने उडवले आहे. यात रेवनसिध्द उर्फ दयानंद मोटे याचा ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली डोके आल्याने जागीच मृत्यू झाला आहे. रेवणसिध्द मोटे हा नंदेश्वर येथे सात महिन्यापूर्वी तो आला होता. येथे त्याची पान टपरी आहे. पुणे ते नंदेश्वर असा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय म्हणून करत होता. तो आज कामानिमित्त मंगळवेढा येथे आला होता. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल वैभव घायाळ, पोलीस हवालदार दत्तात्रय येलपले, पोलीस कॉन्स्टेबल सुरज साळुंखे आदींनी भेट दिली आहे.