Breaking; वाळू वाहतूक करणाऱ्या तीन होड्या फोडल्या; पंढरपूर पोलिस, महसूलची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 07:53 AM2021-06-08T07:53:05+5:302021-06-08T07:53:34+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर : भीमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाळू वाहतूक करणाऱ्या तीन होड्या फोडण्याची कारवाई पोलिस व महसूल विभागाने संयुक्तरीत्या केली आहे.
भीमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांना मिळाली. त्यांनी मंडल अधिकारी समीर मुजावर, तलाठी प्रशांत शिंदे, तलाठी राजेंद्र वाघमारे, पोलीस कर्मचारी ताजुद्दिन मुजावर, पी आर हजारे, होमगार्ड शंकर कांबळे हे भीमा नदीवरील अहिल्यादेवी पुलानजीक गेले. यावेळी त्यांना तीन होड्यांमधून वाळू वाहतूक होत असल्याचे दिसून आले. महसूल व पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहतच वाळू उपसा व वाळू वाहतूक करणारे पळून गेले.
यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपये किंमतीच्या तीन होड्या जेसीबीच्या साहाय्याने फोडल्या व पाच हजार रुपये किंमतीची वाळू नदीपात्रात पुन्हा टाकली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.