Breaking; सोलापुरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
By appasaheb.patil | Published: April 18, 2020 04:06 PM2020-04-18T16:06:37+5:302020-04-18T16:16:55+5:30
चारचाकी गाड्यांसह घरांचे झाले नुकसान; विजेच्या तारा तुटल्या...
सोलापूर : उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना शनिवारी काहीसा दिलासा मिळाला. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर शहरासह परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, तर काही गावात गाराही पडल्याची माहिती समोर आली आहे. या वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे चार चाकी गाड्यासह घरांचे ही नुकसान झाले.
मागील तीन ते चार दिवसापासून सोलापूरच्या तापमानात वाढ झाले होते एवढेच नव्हे तर सकाळी गारवा दुपारी कडकडून आणि रात्री पाऊस असा काही सांगा सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी अनुभवला मात्र शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी, कारंबा, गुळवंची, भोगाव यासह सोलापूर शहरातील काही भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. मराठी सेवालाल नगर नरोटेवाडी परिसरातील गावांमध्ये पावसानेे अनेकांच्या घरांचे नुकसान केले.
दरम्यान शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासूनच शहरात जोरदार वारे वाहू लागले होते त्यामुळे सोलापूरकरांनी पाऊस येणार असा अंदाज बांधला होता. तीनच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आणि सोलापूरकरांचा अंदाज खरा ठरविला.