Breaking; जुना पुना नाका पुलावरून पाण्याचा प्रवाह वाढला; रस्ता केला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 10:54 AM2021-09-28T10:54:29+5:302021-09-28T10:57:32+5:30
सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी केली परिसराची पाहणी
सोलापूर : सोलापूर शहरातील प्रमुख नाला शेळगी नाला या नाल्याची आज गटनेते आनंद चंदनशिवे यांनी पाहणी केली. या पाहणीमध्ये वसंत विहार, जुना पुना नाका स्मशानभूमी, गणेश नगर, मडकी वस्ती, जुना कारंबा नाका स्मशान भूमी इत्यादी परिसरातील नाला प्रमुख नाला जात असल्यामुळे या सदरच्या नालामध्ये पावसाचे पाणी वाढल्यामुळे या नाल्याला पाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा फ्लो वाढल्यामुळे या भागातील नागरिकांमधील भीतीचा वातावरण सध्या पसरलेला आहे.
दरम्यान, जुना पुना नाका पुलावरून पाण्याचा वाढल्यामुळे रस्ता बंद झाला आहे. गटनेते आनंद चंदनशिवे यांनी नाल्यातील पाण्याचा प्रवाहाला कोणत्या कोणत्या ठिकाणी नाल्याची रुंदी वाढल्यानंतर पाण्याचा प्रवाह पुढे जाईल याची पाहणी केली. त्या पाहणीमध्ये वसंत विहार पुलाच्या पुढील भागात नाला रुंदीकरण न झाल्यामुळे त्या भागातील नागरिकांना त्रास होऊ शकतो, महानगरपालिका अधिकाऱ्यांनी हे काम तातडीने हाती घ्यावे अशी सूचना यावेळी आनंद चंदनशिवे यांनी केले.
सदरची पाहणी यावेळी गटनेते आनंद चंदनशिवे, हनुमंत पवार, संजय इंगळे, बाळासाहेब शिखरे, राम दुधाळ, सागर शिंदे, दत्ता कांबळे आदी उपस्थित होते.