खºयाखुºया समाधानाची लकेर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 03:05 PM2019-05-04T15:05:37+5:302019-05-04T15:05:42+5:30

चार पैशांतून मिळणाºया क्षणिक सुखापेक्षा चेहºयावर चिरंतन समाधान देणाºया स्मृती चिरकाल टिकतात.

Breathe or solve the problem! | खºयाखुºया समाधानाची लकेर !

खºयाखुºया समाधानाची लकेर !

Next

दोन महिन्यांपूर्वी घडलेला प्रसंग आजही चेहºयावर खºयाखुºया समाधानाची लकेर उमटवून जातो. विजापूर रोडवरील जनता बँकेत कर्जाचा हप्ता भरण्यासाठी गेलो असतानाची घटना आहे. काउंटरसमोर खूप मोठी लाईन लागली होती. नेहमीच्या कॅशिअर मॅडमऐवजी एक तरूण कॅशिअरच कर्तव्य बजावताना दिसला. भली मोठी लाईन पुढे सरकत माझा नंबर आला. कर्जाचे दोन हप्ते भरायचे होते. पहिला हप्ता ५ हजारांचा व दुसरा १८०० रुपयांचा.

मी नेहमीप्रमाणे दोन्ही विड्रॉल आणेवारीसह व्यवस्थित भरून दोन्ही देय रकमेसह विड्रॉल कॅशिअरकडे देऊन काउंटरवर थांबलो. कॅशिअर म्हणाले, ‘साहेब एकेक करून विड्रॉल द्या. ‘विड्रॉल’ व हप्त्याची रक्कम परत घेऊन ५००० रूपयांचा विड्रॉल व रक्कम कॅशिअरकडे देऊन मी पुन्हा तिथेच थांबलो. काही वेळाने कॅशिअर म्हणाले, ‘साहेब तुम्ही ४००० रुपये जास्त दिलात. हे घ्या परत. ‘मी रक्कम व विड्रॉल व्यवस्थित दिल्याची खात्री करून कॅशिअरना म्हणालो, ‘सर आपलं काही तरी गैरसमज होतंय, मी बरोबर ५००० रुपये दिलेत... तुम्ही परत दिलेले ४००० रुपये माझे नाहीत, हे परत घ्या.’ मी नाही नाही म्हणत असतानाही त्यांनी बळेच पैसे दिले. शेवटी निर्विकार चेहरा करून दुसरा हप्ता भरून मी घरची वाट पकडली.

बँकेच्या बाहेर पडलो. खिशातले व गाडीच्या डिक्कीतले पैसे पुन्हा मोजले. ४००० रुपये जास्तच वाटले, मग पुन्हा कॅशिअरकडे जाऊन पैसे परत घेण्याची विनंती केली, बँकेतला माझा हेलपाटा व पैसे परत करण्याचे व्यर्थ प्रयत्न तेथील सेविकेनेही हेरले, परंतु कॅशिअरचा पवित्रा पाहून घराकडे वाट वळवली. घरी आल्यावरही पुन्हा आकडेवारीची जुळवाजुळव करून पाहिले तरीही ४००० रुपये जास्तच होताहेत लक्षात आले. सौभाग्यवतीला घडलेली हकिकत सांगितली. तीही निर्विकार चेहºयाने माझ्याकडे बघत म्हटली, ‘जास्तीचे पैसे आपले नाहीत, खातेपुस्तकातच ठेवून द्या, कोणाचे आहेत कळल्यावर देऊन टाका.’ आणि शेवटी नाईलाजाने मला ती रक्कम खातेपुस्तिकेत ठेवायला भाग पडले.

बँकेला दोन दिवस सुट्टी असल्याने विषय पुढे निघालाच नाही. तिसºया दिवशी दुपारी दीड वाजता त्याच बँकेच्या माझ्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर मिसकॉल येऊन गेल्याचे समजताच मी लगेचच त्याच क्रमांकावर फोन केला, तिकडून आवाज आला, ‘घोडके साहेबच बोलता आहात का? ‘मी म्हटलं, ‘होय..आपण?’ तिकडून, ‘साहेब मी विजापूर रोड जनता बँकेतून प्रशांत शिंदे...‘मी त्यांना पुढे बोलायच्या आतच, ‘शिंदे साहेब मला खात्री होती तुमचा फोन येणारच म्हणून..पाचच मिनिटांत मी बँकेत पोहोचतो... ‘असं बोलतच बँकेत पोहोचलो. दिनेश साहेबांनी हात जोडले, ‘साहेब ते ४००० रुपये आमच्या बँकेचेच आहेत. परवा हिशोब करताना लक्षात आले...‘त्यांच्या बोलण्याला मध्ये तोडतच मी खातेपुस्तकातील रक्कम त्यांच्या हातात ठेवून निघणार एवढ्यात बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी माझ्याजवळ आले आणि आभारसत्र सुरू केले. चहापानासाठी विनंती केली. मी त्यावेळची सर्व घटना पुन्हा एकदा सांगितली आणि शेवटी एकाच वाक्यात, ‘जी रक्कम माझी नाहीच ती रक्कम वापरण्याचा मला अधिकार नाही. असो, योग्य ठिकाणी रक्कम परत देतोय यातच समाधान आहे.’ असं सांगत मी खºयाखुºया आनंदी चेहºयानं घराकडे निघालो.

वरील प्रसंग मनाला चिरस्मरणीय आनंद देणारा ठरला. कारण आई-वडील, आजी-आजोबा, भावाबहिणीने केलेले चांगले संस्कारच अशावेळी कामाला येतात. फुकटच्या धनलाभापासून लांब जाण्यास भाग पाडतात, चांगुलपणाची भावना जागृत करतात. चांगला विचार करायला लावणाºया मनाला प्रोत्साहन देण्यासाठी धडपड करतात. चार पैशांतून मिळणाºया क्षणिक सुखापेक्षा चेहºयावर चिरंतन समाधान देणाºया या स्मृती चिरकाल टिकतात.
- आनंद घोडके
(लेखक शिक्षक आहेत) 

Web Title: Breathe or solve the problem!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.