लाचेची मागणी; लिपिकाला अटक
By admin | Published: May 21, 2014 01:23 AM2014-05-21T01:23:40+5:302014-05-21T01:23:40+5:30
माळशिरस : माळशिरस येथील भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक कोकाटे यांनी ५00 रूपये लाचेची मागणी केल्याने त्याच्यावर माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने त्याला अटक करण्यात आली
Next
माळशिरस : माळशिरस येथील भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक कोकाटे यांनी ५00 रूपये लाचेची मागणी केल्याने त्याच्यावर माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने त्याला अटक करण्यात आली. तक्रारदारांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या खंडाळी (ता. माळशिरस) येथील शेतीची मोजणी करून देण्यासाठी लिपिक भूकर मापक रघुनाथ कोकाटे यांनी ५00 रूपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. याबाबत चौकशी करीत कोकाटे याने मागितलेल्या लाचेच्या रकमेबाबत २५ डिसेंबर २0१३ रोजी पडताळणी केली असता, पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले. यामुळे मंगळवारी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.