रेशन कार्ड काढण्यासाठी दीड हजाराची लाच; बार्शीत डाटा एन्ट्री ऑपरेटरला अटक
By Appasaheb.patil | Updated: June 18, 2024 18:46 IST2024-06-18T18:45:57+5:302024-06-18T18:46:43+5:30
१८ जून रोजी काळे यांनी पडताळणी कारवाईमध्ये रेशनकार्डावर धान्य सुरू करण्यासाठी १५०० रूपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

रेशन कार्ड काढण्यासाठी दीड हजाराची लाच; बार्शीत डाटा एन्ट्री ऑपरेटरला अटक
सोलापूर : पिवळ्या रेशनकार्डवर धान्य सुरू करण्यासाठी १५०० रूपयांची लाचेची मागणी करून १५०० रूपये स्वीकारताना बार्शी तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेतील डाटा इंन्ट्री ऑपरेटरला सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. वर्षा भगवान काळे (मु.पो. कांदलगांव रोड, सायली हॉटेलशेजारी, बार्शी) असे लाच स्वीकारलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या पिवळ्या रेशनकार्डवर धान्य मिळत नसल्याने तक्रारदार यांनी बार्शी तहसिलदार कार्यालय, पुरवठा शाखा येथील डाटा इंन्ट्री ऑपरेटर यांना भेटून लेखी अर्ज १४ जून २०२४ रोजी दाखल केला होता. यावेळी डाटा एंन्ट्री ऑपरेटर काळे यांनी अर्ज स्वीकारताना १५०० रूपये लाचेची मागणी करून अर्ज व पैसे घेऊन १८ जून २०२४ रोजी बोलावले होते. त्यावरून १८ जून रोजी काळे यांनी पडताळणी कारवाईमध्ये रेशनकार्डावर धान्य सुरू करण्यासाठी १५०० रूपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
या कारवाईवरून बार्शी शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरीषकुमार सोनवणे, पोलिस नाईक संतोष नरोटे, पोलिस शिपाई रवि हाटखिळे, शाम सुरवसे आदींनी यशस्वी केली.