सर्वपक्षीय शोकसभेत भारत भालकेंच्या आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:16 AM2020-12-07T04:16:23+5:302020-12-07T04:16:23+5:30
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा शहरासह तालुक्यातील प्रत्येक नागरिकांसाठी आमदार भारत भालके २४ तास उपलब्ध होते. त्यांच्याकडे कोणीही हक्काने जाऊन काम ...
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा शहरासह तालुक्यातील प्रत्येक नागरिकांसाठी आमदार भारत भालके २४ तास उपलब्ध होते. त्यांच्याकडे कोणीही हक्काने जाऊन काम सांगत असे. ते त्याच्यासमोरच मार्गी लावत होते. त्यांनी कधी विरोधक, समर्थक असा भेदभाव केला नाही. कायम जनता सोबत नेणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ख्याती होती. आपल्या रांगड्या भाषेतून ते जनतेचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडत व त्याची सोडवणूक करून घेत. यामुळे पंढरपूरच्या नागरिकांच्या मनावर राज करणारा राजा गेला असे म्हणत पंढरपुरातील विविध नेत्यांनी आ. भालके यांच्या आठवणींना उजाळा दिला.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आ. भारत भालके यांना आदरांजली वाहण्यासाठी पंढरपूर येथे सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्या वतीने शोकसभा घेण्यात आली. यावेळी अनेक नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, नगराध्यक्षा साधना भोसले, विठ्ठल साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक, धाराशीव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे, अरुण कोळी, गणेश अंकुशराव, दिलीप देवकुळे, नगरसेवक डी. राज सर्वगोड, विक्रम शिरसट, संदीप मांडवे यांचा सहभाग आहे.
फोटो लाईन
पंढरपूर येथे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत सहभागी झालेले नागरिक व पदाधिकारी.