नाशिकला स्थलांतरित केलेले आरपीएफ ट्रेनिंग सेंटर पुन्हा चिंकहिलला आणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:22 AM2021-04-04T04:22:21+5:302021-04-04T04:22:21+5:30
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने वर्कस मशिनरी आणि रोलिंग स्टाफ प्रोग्रॅम सन २०१५-१६ मध्ये ...
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने वर्कस मशिनरी आणि रोलिंग स्टाफ प्रोग्रॅम सन २०१५-१६ मध्ये याविषयी उल्लेख केलेला आहे. प्रोग्रॅम आयटम नंबर ५८३ नुसार येथील ट्रेनिंग सेंटरचा विकास करण्यासाठी २ कोटी ९१ लाख मंजूर केले होते. त्याचप्रमाणे त्या प्रोग्रॅममध्ये ट्रेनिंग सेंटर नाशिकला हलविण्यासाठी आयटेम नंबर ५७० नुसार ४ कोटी ९२ लाख मंजूर करण्यात आले होते.
सन २०१६ मध्ये अचानकपणे येथील ट्रेनिंग सेंटर नाशिकला हलविण्यात आले. त्यामुळे एक प्रकारे येथील सोलापूर डिव्हिजनवर अन्याय झालेला आहे. चिंकहिल येथील ट्रेनिंग सेंटरला विकासासाठी निधी मंजूर असताना ते नाशिकला हलविण्याची काही गरज नव्हती; कारण येथील ट्रेनिंग सेंटर अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असणारी व इतर साधनसामग्री येथे उपलब्ध आहे.
नाशिकचा मंजूर निधी येथील ट्रेनिंग सेंटरच्या विकासासाठी ट्रान्स्फर करावा व अधिकचा पाच कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशीही मागणी रामानंद सरस्वती महाराजांनी केलेली आहे.
फोटो -
परमपूज्य श्री रामानंद सरस्वती महाराज