पंतप्रधान मोदींच्या व्हिडीओ कॉन्फरन्सचे करमाळ्यात प्रसारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:18 AM2020-12-26T04:18:27+5:302020-12-26T04:18:27+5:30

पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकऱ्यांसाठी केलेल्या कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. दरम्यान, पीएम किसान योजनेअंतर्गत नऊ कोटी शेतकऱ्यांच्या ...

Broadcast of PM Modi's video conference in Karmala | पंतप्रधान मोदींच्या व्हिडीओ कॉन्फरन्सचे करमाळ्यात प्रसारण

पंतप्रधान मोदींच्या व्हिडीओ कॉन्फरन्सचे करमाळ्यात प्रसारण

Next

पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकऱ्यांसाठी केलेल्या कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. दरम्यान, पीएम किसान योजनेअंतर्गत नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २००० रुपयांप्रमाणे १८ हजार कोटी सन्मान निधी जमा केला.

याप्रसंगी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. विस्तारक भगवान गोसावी यांनी अटलजींच्या जीवन चरित्राची माहिती दिली.

आभार किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजयकुमार नागवडे यांनी मानले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन, तालुका सरचिटणीस सुहास घोलप, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, दादासो देवकर, विश्व हिंदू परिषदेचे संतोष वाळुंजकर, अक्षय कुंभार, सूरज शेख, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अश्विनी भालेराव, वनिता साळुंखे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजश्री खाडे, चंपावती कांबळे, मनोज मुसळे, मच्छिंद्र हाके, हर्षद गाडे, माणिक नीळ, भारत चौधरी, संदेश शिंदे, महेश कदम उपस्थित होते.

Web Title: Broadcast of PM Modi's video conference in Karmala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.