जमीन नावावर करून देण्यावरून भावजयीला दिराकडून मारहाण
By काशिनाथ वाघमारे | Published: July 14, 2023 09:57 PM2023-07-14T21:57:29+5:302023-07-14T21:58:19+5:30
दिराची पत्नी व तिच्या नणंदेनेही तिला शिविगाळ करून मारहाण केली.
सोलापूर : अर्धा एकर शेतजमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून दिराने घरात घुसून भावजयीला शिविगाळ व दमदाटी करीत काठीने मारहाण केली. घरात डब्यात ठेवलेले रोख ५० हजार रुपये, दोन तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पाच हजारांचा मोबाइल जबरदस्तीने घेतल्याची तक्रार दिली. त्यावेळी दिराची पत्नी व तिच्या नणंदेनेही तिला शिविगाळ करून मारहाण केली.
ही घटना शुक्रवार, १४ रोजी सकाळी ६.३०च्या सुमारास सांगोला तालुक्यात महूद (ढाळेवाडी) येथे घडली. याबाबत, प्रियांका सोमनाथ मेटकरी यांनी फिर्याद दिली आहे. सांगोला पोलिसांनी दीर सीताराम लक्ष्मण मेटकरी, जाऊ लक्ष्मी सीताराम मेटकरी, नणंद जनाबाई मोहन वाघमोडे (सर्वजण रा. महूद - ढाळेवाडी, ता. सांगोला) यांच्याविरूद्ध सांगोला पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.