भावाविरुद्ध भाऊ अन्‌ जाऊबाई आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:12 AM2021-01-08T05:12:39+5:302021-01-08T05:12:39+5:30

अक्कलकोट : मांजी मंत्री असलेल्या पार्वतीबाई मलगोंडा यांचं गाव असलेल्या नागणसूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारानं चांगलाच जोर धरला आहे. इथं ...

Brother-in-law and brother-in-law face to face | भावाविरुद्ध भाऊ अन्‌ जाऊबाई आमने-सामने

भावाविरुद्ध भाऊ अन्‌ जाऊबाई आमने-सामने

Next

अक्कलकोट : मांजी मंत्री असलेल्या पार्वतीबाई मलगोंडा यांचं गाव असलेल्या नागणसूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारानं चांगलाच जोर धरला आहे. इथं पाहुण्यारावळ्यांबरोबरच नातीगोती असलेले भावाविरुद्ध भाऊ अन्‌ जाऊबाईंची लढत लक्षवेधी ठरू लागली आहे. सोशल मीडियावरून दोन्ही बाजूकडून होणाऱ्या प्रचाराची चर्चेची रंगत वाढली आहे.

नागणसूर हे माजी मंत्री कै. पार्वतीबाई मलगोंडा यांचे गाव. इथं प्रत्येक निवडणूक अत्यंत चुरशीने होत असते. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बऱ्याच प्रभागांत भावांविरुद्ध भाऊ आणि जावांंविरुद्ध जावा अशा रंगतदार निवडणुका होत आहेत. हे गाव तालुक्यात मोठे आणि नेहमीच चर्चेत असते. अक्कलकोटपासून २२ किलोमीटर असलेल्या या गावात लिंगायत समाजाचं प्राबल्य. अनेकवेळा या गावच्या वातावरणाने तालुक्याच्या, विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात फरक पडतो. विद्यमान आमदार सचिन कल्यांणशेट्टी यांचं हे आजोळ आहे.

सध्या गावात स्थानिक पातळीवर गटतट एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. अनेक वर्षे स्व. गुरुसिद्धप्पा प्रचंडे यांच्या नावाचा दबदबा होता. सध्या प्रचंडे विरुद्ध गंगोंडा, थंब, डोंगरीतोड, कल्याण असे अनेक गट एकत्रित येऊन लढा देत आहेत. दोन दिवसांपासून दोन्ही गटांनी सोशल मीडिया, बॅनरबाजी, रिक्षातून ध्वनिक्षेपनाद्वारे प्रचार, वैयक्तिक गाठीभेठी, सार्वजनिक, वैयक्तिक कामांचे आश्वासन देणे, आदींच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. धनलक्ष्मीबरोबर नात्यागोत्याच्या राजकारणाने जोर धरला आहे. अनेकांना पाहुणे-रावळे आठवू लागले आहेत. कोणाची जवळीक कुठे आहे, कोण कोणाचे ऐकतात असे मार्ग शोधून विजयी होण्यासाठी उमेदवारांनी धडपड चालवली आहे.

एकेकाळी या गावचे राजकारण मलगोंडा, प्रचंडे, शिवमूर्ती, थंब यांच्याभोवती फिरायचे. आता नवी पिढी रिंगणात उतरली आहे.

----अशा आहेत नात्यागोत्यांच्या लढती

या निवडणुकीत नागणसूरमध्ये शकुंतला कोळी विरुद्ध सुंदना कोळी या जाऊबाईंमध्ये रंगतदार लढत होत आहे. बसवराज गंगोंडा विरुद्ध शरणप्पा गंगोडा हे सख्खे भाऊ आमने-सामने लढत आहेत. इंदुबाई नागलगाव विरुद्ध गंगाबाई नागलगाव याही जावा-जावांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. धनराज धानशेट्टी विरुद्ध अजित धानशेट्टी या चुलत भावांविरुद्ध प्रचार रंगला आहे. एकमेकांचे उणेदुणे निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारात निघत आहे.

इन्फो बॉक्स

नागणसूरमध्ये सहा प्रभागांतून १७ सदस्य निवडीसाठी निवडणूक होत आहे. दोन्ही पॅनेलमधून ३४, तर ६ अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तब्बल ७,३५० मतदार असून, स्त्री मतदार ३३७५, तर पुरुष मतदार ३९७५ आहेत. स्थलांतरित मतदार एक हजार असून, या मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येकाने जोर लावला आहे.

-----

Web Title: Brother-in-law and brother-in-law face to face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.