मंगळवेढ्यात सख्ख्या भावाने भावाचे कुटुंब पेटवले, मुलाचा मृत्यू; पती-पत्नी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 10:40 PM2019-11-07T22:40:28+5:302019-11-07T22:40:35+5:30

कर्ज फेडण्यासाठी भाऊ पुढाकार घेत नाही या कारणावरून चिडून जाऊन सख्ख्या भावाच्या कुटुंबाला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना महंमदाबाद (हुन्नुर) ता.मंगळवेढा येथे ६ नोव्हेंबर रोजी घडली.

Brother-in-law burnt brother's family, child's death The husband and wife were seriously injured | मंगळवेढ्यात सख्ख्या भावाने भावाचे कुटुंब पेटवले, मुलाचा मृत्यू; पती-पत्नी गंभीर जखमी

मंगळवेढ्यात सख्ख्या भावाने भावाचे कुटुंब पेटवले, मुलाचा मृत्यू; पती-पत्नी गंभीर जखमी

Next

सोलापूरः कर्ज फेडण्यासाठी भाऊ पुढाकार घेत नाही या कारणावरून चिडून जाऊन सख्ख्या भावाच्या कुटुंबाला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना महंमदाबाद (हुन्नुर) ता.मंगळवेढा येथे ६ नोव्हेंबर रोजी घडली. यात शरद सोपान घुंबरे (वय १२) जास्त भाजल्याने याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सोपान रामचंद्र घुंबरे (वय ४५) व सोनाबाई सोपान घुंबरे (वय ४०) हे दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, लक्ष्मण रामचंद्र घुंबरे (वय ४२) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी सोपान रामचंद्र घुंबरे, पत्नी सोनाबाई व मुलगा शरद असे महंमदाबाद (हुन्नुर) लक्ष्मी चौक येथील घराचा दरवाजा उघडा ठेवून घरात झोपले असताना फिर्यादीचा सख्खा भाऊ आरोपी लक्ष्मण रामचंद्र घुबरे याने फिर्यादीच्या घरात येऊन फिर्यादी, त्याचे झालेले कर्ज फेडण्यासाठी पुढाकार घेत नाही.

तसेच रेशनिंग कार्ड वेगवेगळे करण्याकरिता असणाऱ्या त्रुटींची पूर्तता करत नाही या कारणावरून चिडून जाऊन त्याने सोबत आणलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीतील पेट्रोल फिर्यादीच्या अंगावर व फिर्यादीच्या पत्नी सोनाबाई तसेच मुलगा शरद यांच्या अंगावर टाकून त्याचे जवळील काडी पेटीने पेटवून दिले यात मुलगा शरद याला जास्त भाजले असल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर पती-पत्नी हे गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: Brother-in-law burnt brother's family, child's death The husband and wife were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.