बीएसएनएल सेवा विस्कळीत; बँका, गॅस एजन्सींना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:21 AM2021-02-07T04:21:10+5:302021-02-07T04:21:10+5:30
ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत, सहकारी बँकांचे मोठे जाळे आहे. यामुळे शेतकऱ्यांचे बहुतांश व्यवहार याच बँकांतून चालतात. सरकारने रोखीवर बंदी ...
ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत, सहकारी बँकांचे मोठे जाळे आहे. यामुळे शेतकऱ्यांचे बहुतांश व्यवहार याच बँकांतून चालतात. सरकारने रोखीवर बंदी आणल्याने अनेक शेतकरी ट्रान्सफरचा व्यवहार करण्यासाठी पुढे येत असताना वारंवार खंडित होणाऱ्या बीएसएनएलच्या सेवेमुळे या सेवेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे बँकांच्या ग्राहकांसह गॅस एजन्सीच्या ग्राहकांनाही फटका बसत असल्याचे चित्र आहे. यामध्ये साेलापूर वरिष्ठ प्रबंधकांनी लक्ष घालून ही सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांमधून करण्यात येत आहे.
कोट ::::::::::::::::::::::::
रस्त्याच्या सुरू असलेल्या कामांमुळे बीएसएनएलची सेवा अधूनमधून खंडित होत आहे. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून बीएसएनएलकडून सध्या अकलूजमार्गे पंढरपूरकडे ही सेवा जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे झाल्यास ग्राहकांची गैरसोय थांबणार आहे. आणखी काही दिवस ग्राहकांनी बीएसएनएलला सहकार्य करावे, अखंडित सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- श्रीशैल अंकोलीकर
कनिष्ठ अभियंता, पंढरपूर