बुद्धेहाळ तलावाचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:15 AM2021-07-19T04:15:41+5:302021-07-19T04:15:41+5:30
बुद्धेहाळ (ता. सांगोला) येथील मध्यम प्रकल्प डाकबंगला परिसरात सेवानिवृत्त अभियंता एल. बी. केंगार यांच्या संकल्पनेतून देशी औषधी वनस्पतींच्या लागवडीचा ...
बुद्धेहाळ (ता. सांगोला) येथील मध्यम प्रकल्प डाकबंगला परिसरात सेवानिवृत्त अभियंता एल. बी. केंगार यांच्या संकल्पनेतून देशी औषधी वनस्पतींच्या लागवडीचा शुभारंभ आ. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी टेंभू उपसा सिंचन योजना उपविभागीय अभियंता सुशीलकुमार गायकवाड, वनक्षेत्रपाल अजित सूर्यवंशी, एल. बी. केंगार, पांडुरंग मिसाळ, सरपंच सरगर, उपसरपंच पोपट यादव, भिकाजी बाबर, दीपक ऐवळे, दगडू बाबर, आर. एस. बाबर, डाॅ. चांडोले, कवी ज्ञानेश डोंगरे, रामचंद्र केंगार, जनार्दन बाबर,
अमोल बाबर, केराप्पा लवटे, एम. डी. लवटे, बाळासाहेब सुरवसे, गणेश कांबळे, शहाजी घाडगे, औंदुबर गोडसे, तानाजी जरग, सचिन गडदे आदी उपस्थित होते.
कोट :::::::::::::::::::::
वृक्षवेलींची लागवड करून महाराष्ट्रातील तानसा, नागझिरा, भंडारा तलावाच्या धर्तीवर अभयारण्य उभे राहू शकते. विविध जलाशय परिसर पर्यटनस्थळ झाल्याने आसपासच्या परिसरात आर्थिक बाजारपेठ उपलब्ध होईल.
- बी. एल. केंगार
सेवानिवृत्त अभियंता
फोटो ओळ :::::::::::::::::::
बुद्धेहाळ येथील डाकबंगला परिसरात आ. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते वृक्षलागवड करतानाचे छायाचित्र.