सनराइजकडून चिमुकल्यांना बजेट मॅनेजमेंटचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:16 AM2021-06-21T04:16:10+5:302021-06-21T04:16:10+5:30
टेंभुर्णी : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ...
टेंभुर्णी : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘बजेट मॅनेजमेंट’ व ‘लिटल शेफ’ या नावीन्यपूर्ण स्पर्धा घेण्यात आल्या. ऑनलाइन शिक्षणातून आलेला मुलांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून झाला. संस्थेच्या सचिव सूरजा बोबडे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रिन्सिपल कीर्ती चौधरी, कॉर्डिनेटर नेहा पांडे, सहशिक्षक राहुल जळकोटे, अजित घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे वैशिष्ट्य म्हणजे पालकांच्या मदतीने मुलांनी शेफचा वेश परिधान करून सुंदररीत्या नॉन गॅस रेसिपीचे सादरीकरण केले. गॅसशिवाय वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो हा आत्मविश्वास मुलांना मिळाला. प्राचार्या कीर्ती चौधरी यांनी दिलेल्या पैशातून मुलांसाठी फेअरवेल पार्टीचे बजेट प्लॅन केले होते.
--
फोटो : २० सनराईज स्कूल
लिटिल शेफ स्पर्धेत भाग घेतलेले सनराइज् स्कूलचे विद्यार्थी.