रानगव्याने धडक दिल्याने म्हैस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:34 AM2021-02-23T04:34:49+5:302021-02-23T04:34:49+5:30

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, मोहोळ, माढा, पंढरपूर, आदी तालुक्यांत हिंस्र प्राण्याने जनावरे, माणसावर हल्ला केल्याने भीतीचे वातावरण कायम आहे. अशातच ...

The buffalo was injured when it was hit by a buffalo | रानगव्याने धडक दिल्याने म्हैस जखमी

रानगव्याने धडक दिल्याने म्हैस जखमी

Next

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, मोहोळ, माढा, पंढरपूर, आदी तालुक्यांत हिंस्र प्राण्याने जनावरे, माणसावर हल्ला केल्याने भीतीचे वातावरण कायम आहे. अशातच सांगोला तालुक्यातील महूद, ठोंबरेवाडी, महिम, कारंडेवाडी परिसरात हिंस्र प्राण्याने हल्ला केल्यामुळे शेळ्या-मेंढ्या, जनावरे फस्त केल्याच्या घटना घडल्याने शेतकरी ग्रामस्थांमधून भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, सोमवारी सायं. ५.१५ च्या सुमारास कमलापूर अंतर्गत अनुसेमळा येथे विनायक अनुसे या तरुणास त्यांच्या मक्याच्या पिकात भल्यामोठ्या रानगव्याचे दर्शन झाले.

रानगव्याने अचानक सैरभैर धावत धुडगूस घालत असताना त्याने विनायक अनुसे यांच्या म्हशीला धडक दिल्याने खरचटले आहे, तर परिसरातील पिकांतून सैरभैर पळत सुटल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले. ग्रामस्थांनी त्या रानगव्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता तो पिकात लपून बसला आहे. वनविभागाकडून त्या रानगव्यास पकडून कमलापूर भयमुक्त करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रानगव्याला कळपात पाठविण्याचे प्रयत्न सुरू

हा रानगवा कळपातून भरकटला असावा. त्याने कमलापूर येथून वासुद परिसरात पलायन केले आहे. उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील व सहा. वनरक्षक बी. जे. हाके, सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी विजय भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक धनंजय देवकर, वनपाल खंडेभराट, वाहन चालक स्वप्निल दौंड, कमलापूर, गोडसेवाडी, वासुद गावचे पोलीस पाटील, दीपक ऐवळे यांच्याकडून ग्रामस्थांमधून जनजागृती सुरू केली आहे. पुण्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून काळजी घेऊन त्याला परत कळपात पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाटे यांनी सांगितले.

फोटो ओळ ::::::::::::::::::: २२पंड०७

कमलापूर अंतर्गत अनुसेमळा येथील रानगव्याचे छायाचित्र.

Web Title: The buffalo was injured when it was hit by a buffalo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.