म्हशीची तर चोरी केलीच पण रेडकालाही सोडले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:24 AM2021-03-23T04:24:07+5:302021-03-23T04:24:07+5:30
वासूद येथील हनुमंत धर्मराज गोडसे यांची एक महिन्यापूर्वी म्हैस व्यायली असून, तिला रेडकू आहे. त्यांनी कडलास येथील मलसिद्ध निवृत्ती ...
वासूद येथील हनुमंत धर्मराज गोडसे यांची एक महिन्यापूर्वी म्हैस व्यायली असून, तिला रेडकू आहे. त्यांनी कडलास येथील मलसिद्ध निवृत्ती गायकवाड यांची शेतजमीन वाट्याने केली आहे. त्या ठिकाणी आईवडील राहण्यास आहेत. २१ मार्च रोजी सायं. ७ च्या सुमारास ते कडलास येथून वासूद येथील घराकडे परतले. दुसऱ्या दिवशी २२ मार्च रोजी स. ६ च्या सुमारास शेतातील कामे चालू असल्याने शेतात गेले.
दरम्यान घरासमोर बांधलेली म्हैस दिसून आली नाही म्हणून त्यांनी आई-वडिलांना म्हैस कोठे आहे, असे विचारले. त्यांनी रात्री जेवण करून आम्ही १०च्या सुमारास घरात झोपलो होतो, त्यावेळी म्हैस दारातच होती. दरम्यान, पहाटे ५च्या सुमारास झोपेतून उठून बाहेर आलो असता घरासमोर म्हैस दिसून आली नाही. कदाचित म्हैस दोरी सुटून निघून गेली असेल म्हणून तिचा आजूबाजूला शोध घेतला. मात्र ती कोठेच मिळून आली नाही. याबाबत हनुमंत गोडसे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.