उजनी कालव्यावर पूल बांधा, नदीकाठच्या गावांची सोय होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:28 AM2021-09-08T04:28:08+5:302021-09-08T04:28:08+5:30

अकलूज ते वाफेगाव या रस्त्यावर उजनी धरणाच्या उजव्या कालव्यावर पूर्वीचा सुमारे ४० वर्षांपूर्वीचा जुना पूल आहे. सदरचा पूल हा ...

Build a bridge over the Ujani canal, it will cater to the riverside villages | उजनी कालव्यावर पूल बांधा, नदीकाठच्या गावांची सोय होईल

उजनी कालव्यावर पूल बांधा, नदीकाठच्या गावांची सोय होईल

Next

अकलूज ते वाफेगाव या रस्त्यावर उजनी धरणाच्या उजव्या कालव्यावर पूर्वीचा सुमारे ४० वर्षांपूर्वीचा जुना पूल आहे. सदरचा पूल हा अरुंद व लहान आहे. या पुलाचे आयुर्मान कमी झाले असून नवीन पुलाचे बांधकाम करणे अत्यंत आवश्यक आहे. या पुलावरून माळशिरस तालुक्यातील पूर्वभागातील भीमा नदीकाठची गावे, तसेच माढा व पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत सोईस्कर आहे तरी अकलूज ते वाफेगांव या रस्त्यावर उजनी धरणाच्या उजव्या कालव्यावरील पुलाचे बांधकामास प्रशासकीय मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

.......................

नांदोरे-आव्हे रस्त्यालाही हवे निधी

नांदोरे (ता.पंढरपूर) येथील नांदोरे ते आव्हे हा ४ कि.मी. रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत खराब झालेला आहे. नागरिकांच्या गैरसोयी निर्माण होऊन वाहतुकीच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. तरी नांदोरे ते आव्हे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे.

.........

(फोटो :आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील)

Web Title: Build a bridge over the Ujani canal, it will cater to the riverside villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.