रस्त्यात वाहन उभारणे पडले महागात; बार्शीत ७८ जणांवर कारवाईचा बडगा
By काशिनाथ वाघमारे | Updated: September 9, 2023 21:13 IST2023-09-09T21:13:07+5:302023-09-09T21:13:41+5:30
सोलापूर : फळगाडे, रिक्षा, दुचाकी रस्त्यावर लावून वाहतुकीस अडथळे करणा-यांवर बार्शी पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. ७६ वाहन धारकांवर ...

रस्त्यात वाहन उभारणे पडले महागात; बार्शीत ७८ जणांवर कारवाईचा बडगा
सोलापूर : फळगाडे, रिक्षा, दुचाकी रस्त्यावर लावून वाहतुकीस अडथळे करणा-यांवर बार्शी पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. ७६ वाहन धारकांवर शहर वाहतूक पोलिस पथकाने कारवाई करुन शिस्तीचे धडे देण्याचा प्रयत्न केला आहे.
बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीला अडथळा करणा-या वाहनांवर करवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.
सहायक पोलिस उपनिरीक्षक धनाप्पा शेटे, पोलिस कॉन्स्टेबल रमेश माने, दीपक नकाशे, विलास अडसूळ, नारायण भांगे, सागर पावर, बशीर मुलाणी, कुमार माने, शरद साळवी यांच्या पथकाने या कारवाया केल्या आहेत.
वाहतुकीस अडथळे करणारे रिक्षा, फळगाडे यांच्यावर बसस्टँड, पांडे चौक, कोर्टा परिसर, शिवाजी महाविद्यालय आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत काही वाहनधारकांचे वाहन परवाना काही दिवसांसाठी रद्द करून खटले दाखल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.