सोलापुरात इमारतीला लागली भीषण आग; गाड्या, दुकानांचं साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 09:40 PM2021-10-26T21:40:21+5:302021-10-26T21:40:53+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : सोलापूर शहरात रेल्वे लाईन्स भागात असलेल्या सात मजली 7 थ हेव्हन या इमारतीच्या बेसमेंट पार्किंग मध्ये आज सायंकाळी 5:30 च्या सुमारास आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र आगीच स्वरूप रुद्र होतं. पार्किंग मधील अनेक दुचाकी आणि चार चाकी वाहन तसेच येथील उत्सव मंडळाचे साहित्य, मेडिकल दुकानाचे साहित्य इतर फर्निचर जळून खाक झाले आहे.
आग आणि धुराचे लोट प्रचंड होते. इमारतीतील विद्युत पुरवठा खंडित झाला. वरच्या मजल्यावर राहणारे लोक गच्चीवर गेले. यात वृद्ध आणि मुलांचाही समावेश होता. धूर जिन्यामधे तसेच इमारतीतील प्रत्येक घरांमध्ये साठाला. या इमारतीत एकूण 48 फ्लॅट आहेत अशी माहिती मिळाली.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या पाणी फवारणी करत होत्या, तरीही आग दोन तास आटोक्यात आली नाही. अग्निशमनअधीक्षक केदार आवटे स्वतः आग नियंत्रणामध्ये सहभागी झाले होते. अखेर जेसीबी न दर्शनी भाग फोडून पाणी फवारणी तसेच फोम फवारणी करावी लागली. घटनास्थळी पोलिस उपायुक्त बापू बांगर, डॉ. वैशाली कडूकर तसेच पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे आणि पोलिस फोर्स काही वेळातच पोहोचले. येथील नगरसेवक चेतन नरोटे , विनोद भोसले, शेजवाळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना इमारतीतून बाहेर काढण्यात मदत केली. स्वतः उपायुक्त बांगर आणि कडूकर यांनी गच्चीवर जाऊन तेथे थांबलेल्या वृद्ध आणि महिलांना सुरक्षित खाली आणण्यात मदत केली.
दरम्यान, घटनास्थळी पालिका आयुक्त पी. शिवशंकर महापौर श्रीकांचना यन्नंंम यांनी भेट देऊन पाहणी केली. रात्री आठ तीस सुमारास आग आटोक्यात आली आहे.