अक्कलकोटमध्ये इमारत कोसळली; सुदैवाने कोणालाही इजा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:29+5:302021-06-16T04:30:29+5:30
संबंधीत इमारत जुनी आहे. या ठिकाणी दहा ते बारा व्यापारी भाडे तत्त्वावर आहेत. दिवसभर अनेक ग्राहक येत असतात. यापूर्वीसुद्धा ...
संबंधीत इमारत जुनी आहे. या ठिकाणी दहा ते बारा व्यापारी भाडे तत्त्वावर आहेत. दिवसभर अनेक ग्राहक येत असतात. यापूर्वीसुद्धा काही भाग कोसळलेला आहे. याबाबत व्यापाऱ्यांनी नगर पालिकेकडे दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र, याकडे नगर पालिकेने दुर्लक्ष केले आहे. सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास अचानकपणे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील काही भाग
कोसळला. सुदैवाने यावेळी तेथे कोणीच नसल्याने धोका टळला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
---
सदर इमारतीची गेल्या अनेक दिवसांपासून पडझड झालेली आहे. अनेकवेळा नगर पालिकेला लेखी तक्रार दिली आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते.
वेळीच दखल घ्यावी.
- राजकुमार कारिमुंगी, व्यापारी
----
वीर सावरकर इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी संबंधितांकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. रिपोर्टनुसार पाडकाम करायचे का ठेवायचे, हे त्यानंतर ठरवण्यात येणार आहे, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
----१५ अक्कलकोट-बिल्डींग
ए वन चौक येथील वीर सावरकर इमारतीचा काही भाग कोसळलेला दिसत आहे.