घर बांधलं; मात्र गृहप्रवेशाचं स्वप्न अर्धवटच; शहीद सुनील काळेच्या सवंगड्यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 11:08 AM2020-06-24T11:08:52+5:302020-06-24T11:11:03+5:30

पानगावावर शोककळा :नातलगांनी फोडला हंबरडा

Built a house; But the dream of homecoming is only partial; Martyr Sunil Kale's mourning | घर बांधलं; मात्र गृहप्रवेशाचं स्वप्न अर्धवटच; शहीद सुनील काळेच्या सवंगड्यांची खंत

घर बांधलं; मात्र गृहप्रवेशाचं स्वप्न अर्धवटच; शहीद सुनील काळेच्या सवंगड्यांची खंत

Next
ठळक मुद्देशहीद सुनील यांच्याबरोबर त्यांचे आणखी दोन जिवलग मित्र हे तिघे एकाच दिवशी सैन्यात भरती झाले होते़विशेषत: १ जुलैपासून सुनील यांना रजाही मंजूर केली होती, तिघांच्याही सेवानिवृत्तीची तयारी गावातील मित्र चालवले होतेबार्शीत जागा घेऊन नवे घर बांधले़ १३ जुलै रोजी त्यांची सेवानिवृत्ती होती, या सेवानिवृत्तीबरोबर नव्या घराची वास्तुशांतीही केली जाणार होती

प्रसाद पाटील

पानगाव : गावात बरेच मित्र केले... शेतीचा छंदही जडला होता...बार्शीत नव्याने घरही बांधले होते...१३ दिवसांनी महिनाभराची रजा मंजूर झाली...सारे  कुटुंब आनंदात होते... परंतु वार्ता आली दु:खदच़ गृहप्रवेशाचे  स्वप्नही अधुरेच राहिल्याची खंत त्यांच्या सवंगड्यांनी व्यक्त केली.

मंगळवारी पहाटे पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात पानगाव (ता़ बार्शी)चे सुपुत्र सुनील काळे हे शहीद झाले़ पानगावावर शोककळा पसरली असून, त्यांच्या शहीद होण्याचे वृत्त येऊन थडकताच गावातील सारे जुने मित्र एकत्रित आले़ कुटुंबाची काळजी करणारा सुनील यांचे वडील हे काही दिवसांपूर्वी वारले़ मोठा भाऊ नंदकुमार आणि धाकटा  किरण हे दोघे सध्या शेती आणि किराणा दुकान सांभाळत आहेत़ आयुष (सातवी) आणि श्री (चौथी) ही दोन मुले शिक्षण घेत आहेत.

 सुनील हे २००० साली सीआरपीएफमध्ये दाखल झाले आणि हवालदार पदाच्या रँकवर त्यांनी उत्तर प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू काश्मीर, दिल्ली आदी ठिकाणी त्यांनी सेवा बजावलीे़ त्यांच्या सेवानिवृत्तीकडे पत्नी अर्चना आणि ७० वर्षीय माता कुसूम या दोघींचे लक्ष लागून राहिले होते.

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पुढील आयुष्याचे नियोजनही केले होते़ ते सुट्टी घेऊन गावी आल्यानंतर मित्रांमध्ये रमायचे. गावात फिरून ज्येष्ठ मंडळींशी संवाद साधायचे.  नातेवाईकांकडे जायचे. तसेच मित्रांबरोबर गप्पा मारायचे.  याशिवाय सुट्टीतला बराचसा वेळ ते शेतामध्ये घालवित असत.  आधुनिक पीक पेरणी, फवारणी अशा अनेक गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या होत्या.  शेतातील पेरणी असो वा फवारणी ती करताना मोठ्या भावाशी संपर्क साधून विचारपूस करायचे. शेतीवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी ट्रॅक्टरही घेतला होता. दोन दिवसांपूर्वी आई आणि भावाशी त्यांनी संवादही साधला होता.

तत्पूर्वी त्यांनी बार्शीत जागा घेऊन नवे घर बांधले़ १३ जुलै रोजी त्यांची सेवानिवृत्ती होती़ या सेवानिवृत्तीबरोबर नव्या घराची वास्तुशांतीही केली जाणार होती़ गृहप्रवेशाची तयारी सुरू होती़ १ एप्रिल रोजी त्यांना महिनाभराची रजा मंजूर झाली होती़ मात्र                      कोरोना लॉकडाऊनमुळे ही रजा पुढे ढकलून १ जुलैपासून मंजूर करण्यात आली होती़ मुलांनाही वडिलांची ओढ लागलेली   होती. मात्र साºया स्वप्नांवर पाणी फेरले गेले़ 

तिघे मित्र एकाचवेळी सेवेत अन् सेवानिवृत्तीही जवळ
शहीद सुनील यांच्याबरोबर त्यांचे आणखी दोन जिवलग मित्र हे तिघे एकाच दिवशी सैन्यात भरती झाले होते़ राजेंद्र दादा काळे (एनसीसी कमांडो) आणि प्रशांत कृष्णात मोरे (दिल्ली) हे तिघे १३ जुलै २००० साली एकाच वेळी सैन्यात भरती झाले़ त्या तिघांची सेवानिवृत्तीही २० दिवसांवर आली होती़ विशेषत: १ जुलैपासून सुनील यांना रजाही मंजूर केली होती़ तिघांच्याही सेवानिवृत्तीची तयारी गावातील मित्र चालवले होते.

शेतीचे वेड मृत्यूने हिरावले
शहीद सुनील यांना शेतीचे खूप वेड होते़ गावात जवळपास २० एकर द्राक्ष बागायत असून दोनच दिवसांपूर्वी सव्वा लाखांचे फवारणी यंत्र मोठ्या भावाला खरेदी करायला सांगितले होते. त्याची खरेदी झाली आणि उत्सुक्ता लागून राहिली होती़ त्यांनी त्या फवारणी यंत्राचे काही फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर मागविले होते़ सेवानिवृत्तीनंतर शेती चांगली फुलवण्याचे काही प्लॅन आखले होते़ हे सारे अधुरे राहिले़ 

सुनीलचे बलिदान तालुका विसरणार नाही : राजेंद्र राऊत
केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान पानगावचे सुपुत्र सुनील काळे यांनी देशासाठी दिलेले बलिदान तालुका कदापि विसरणार नाही. पानगावला जवानांची मोठी परंपरा आहे. त्यांच्याकडून नेहमीच देशसेवेची प्रेरणा मिळत राहील. त्यांच्या कुटुंबावर जो दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे त्यात संपूर्ण तालुका सहभागी आहे. त्यांना या दु:खातून सावरण्याचे बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दात आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Web Title: Built a house; But the dream of homecoming is only partial; Martyr Sunil Kale's mourning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.