सराफावर हल्ला प्रकरण, तपासासाठी दाेन पथके रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:23 AM2021-03-27T04:23:05+5:302021-03-27T04:23:05+5:30
अधिक माहिती अशी, फिर्यादी मल्लिनाथ पोतदार व सचिन पोतदार हे दोघे तडवळ येथील दुकानातील सर्व दागिने घेऊन २३ रोजी ...
अधिक माहिती अशी, फिर्यादी मल्लिनाथ पोतदार व सचिन पोतदार हे दोघे तडवळ येथील दुकानातील सर्व दागिने घेऊन २३ रोजी दुपारी ४.३० वाजता दुचाकीवरुन एमएच १३ सीएफ ९६०९ कोर्सेगाव येथील घराकडे निघाले होते. तेव्हा तडवळ-मुंढेवाडी रस्त्यावरील रेल्वे गेटजवळ येताच समोरून दोन दुचाकीवरून पाच चोरटे आले. त्यांनी सराफ व्यापाऱ्यांना अडवून मल्लिनाथ पोतदार यांच्या डोक्यावर लोखंडी सळाईच्या रॉडने मारून जखमी केले तसेच सचिन पोतदार यांच्या डोळ्यात तिखट टाकुन ५४ लाख रुपये किमतीचे सोने चांदी दागिन्याची बॅग घेऊन केगाव मार्गाने पसार झाले. जखमी दोघे भावांवर सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
धाडसाने दरोडेखोराला मारली मिठी
हल्ला केल्यानंतर जखमी अवस्थेतील फिर्यादी मल्लिनाथ पोतदार यांनी धाडसाने दरोडेखोराला मिठी मारून चोर चोर ओरडू लागले. शेजारील लोकही जमा झाले. दरम्यान भाऊ सचिन हातातील रॉड काढून घेतला. तेव्हा रवी राजकुमार जमगे वय-२५ रा. गडगी ता. औराद जि. बिदर, कर्नाटक याला पकडले. त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याने शिवशरण जमगे, सुलतान व अकबर यातील दोघांचे पूर्ण नाव माहिती नाही. एक अज्ञात असे पाच जणांनी संगनमताने हा हल्ला केला.
पाळत ठेवून केलेले कृत्य
मी अनेक वर्षांपासून सोने, चांदीचा व्यापारी आहे. पण असे कधीही घडलेले नाही. आमच्याबाबतीत घडलेली घटना गंभीर आहे. अक्षरशः सिनेमातील थराराप्रमाणे घटना घडली. या घटनेत आमचा जीव वाचला हे महत्वाचे आहे. दरोडेखोरांनी पाळत ठेऊन पूर्व नियोजित कृत्य केलेले आहे. या घटनेमुळे आम्हा कुटुंबाना एक प्रकारचा धक्का बसला असून भीती निर्माण झाली आहे. तरी पोलिसांनी दरोडेखोरांना लवकर ताब्यात घेऊन अटक करावी. आम्हाला न्याय द्यावा, असे मल्लिनाथ पोतदार यांनी सांगितले.