उत्तर तालुक्याचा भार एकाच अभियंत्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:21 AM2021-09-13T04:21:18+5:302021-09-13T04:21:18+5:30

उत्तरला सोलापूर : रस्ते, घरकुल, शाळा खोल्या, आरोग्य केंद्र, १५ वा वित्त आयोग, आमदार निधी, जिल्हा नियोजनचा निधी ...

The burden of North taluka is on one engineer only | उत्तर तालुक्याचा भार एकाच अभियंत्यावर

उत्तर तालुक्याचा भार एकाच अभियंत्यावर

Next

उत्तरला सोलापूर : रस्ते, घरकुल, शाळा खोल्या, आरोग्य केंद्र, १५ वा वित्त आयोग, आमदार निधी, जिल्हा नियोजनचा निधी व इतर योजनांचा मुबलक भार असला तरी अवघा एकच अभियंता उत्तर तालुक्याला कार्यरत आहे. एका शाखा अभियंत्यांची सेवा वर्ग केली असली तरी त्यांचीही दक्षिण सोलापूर तालुक्याला प्रतिनियुक्ती केली आहे. एक उपअभियंता, चार शाखा अभियंता व पाच सहायक अभियंत्यांची फौज जिल्हा परिषद उत्तर सोलापूर बांधकाम कार्यालयात कामकाज पाहत होती. त्याला दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. आता मात्र संपूर्ण कार्यालय रिकामे झाले आहे. कार्यालयात अभियंत्यांची नियुक्तीच केली नसल्याचा हा परिणाम आहे.

एन. डी. भोसले उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असताना चार शाखा अभियंते व पाच सहायक अभियंते येथे काम पाहत होते. फैयाज मुल्ला यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली, तर एन.डी. भोसले कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नतीने सेवानिवृत्त झाले. सहायक अभियंता सना नदाफ, देढे बदलून गेले, तर एस.बी. जगताप, नंदीमठ सेवानिवृत्त झाले. सध्या अभियंता दत्तात्रय मंगरुळे हेच एकमेव कार्यरत आहेत.

अक्कलकोटला नियुक्ती असलेले शाखा अभियंता

बसवंत दहीवडे प्रतिनियुक्तीवर दक्षिण तालुक्याला आहेत. त्यांच्याकडे उत्तर तालुक्याचा एक प्रभाग आहे.

---

सहायक अभियंता एस.बी.

जगताप सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी विद्युत विभागाच्या संकेत कुलकर्णी यांची बदली उत्तर बांधकामला केली आहे. मात्र, ते विद्युत विभागाचे काम जिल्हा परिषदेतून करतात.

मोहोळचे शाखा अभियंता दिलीप गौंड्रे यांच्याकडे मोहोळ व उत्तर तालुका उपअभियंत्यांचा पदभार गेल्या दीड वर्षापासून आहे. गौंड्रे हे कोणतेही काम थांबवीत नाहीत. मात्र, तालुक्याला पूर्ण वेळ उपअभियंता नाही.

Web Title: The burden of North taluka is on one engineer only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.