‘द बर्निंग कंटेनर’ ; कानपूरच्या जळीतग्रस्त कंटेनरच्या मदतीला धावले सोलापूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 01:22 PM2020-09-16T13:22:57+5:302020-09-16T13:25:55+5:30
२० मोपेड भस्मसात; मोटार मालक संघाच्या पदाधिकाºयांचा चालकाला दिलासा
सोलापूर : रस्ता चुकून शहरात येत असलेल्या कंटेनरला बेलाटी चौकात विजेच्या तारांचा स्पर्श होताच ठिणगी पडून वाहनाने पेट घेतला़ यावेळी सलगर वस्तीतील लोकांच्या डोळ्यांसमोर ‘द बर्निंग ट्रेन’ चित्रपट उभा राहिला़ लोकांनी धावत जाऊन कंटेनर थांबविला, पाण्याचा मारा केला़ बेसावध अवस्थेत चालविणाºया वाहन चालकाची पेटलेले वाहन पाहून भंबेरी उडाली़ या आगीमध्ये २० मोपेड वाहने जळून भस्मसात झाली़ इतक्यात येथील ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी मदतीला धावले.
याबाबत संजय दशरथ सिंग (वय ३८, रा़ मोहनपूर, भीमसेन ठाका, सवेडी, कानपूर, उत्तर प्रदेश) या चालकाने याबाबत अकस्मात जळीत अशी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार संजय हा ‘रोडलाईन्स’ कंपनीचा कंटेनर चालवितो़ ६ सप्टेंबर रोजी तो म्हैसूर येथील टीव्हीएस कंपनीतून ४१ वाहने कंटेनर (एऩ एल़०१/ क्यू़ ४१०१) भरून निघाला होता़ त्यामध्ये २० दुचाकी आणि २१ मोपेड वाहने होती़ १० सप्टेंबर रोजी विजयपूरहून सोलापूरमार्गे तो दिल्लीकडे जाण्यासाठी सोलापूर हद्दीत येताच भरकटला़ कुणीतरी त्याला चुकीचा रस्ता सांगितला़ दुपारी ३़३० च्या सुमारास बेलाटी चौकात आला़ इतक्यात विजेच्या तारांचा कंटेनरला स्पर्श झाला आणि ठिणगी उडून ट्रक पेटला.
अन् चालकाची भंबेरी उडाली...
चालकाला काहीच लक्षात येत नव्हते़ तो मुख्य रस्ता शोधत होता़ सलगर वस्ती हद्दीत येताच नागरिकांनी आरडाओरड करून ट्रक थांबविला़ मागे ट्रक पेटल्याचे पाहून संजयची भंबेरी उडाली़ इतक्यात मोटार मालक संघाचे सचिव प्रकाश औसेकर आणि अश्पाक शेख हेही इकडे धावले़ पोलीस आणि फायर ब्रिगेडचे वाहन आले़ आग आटोक्यात आणली़ कंटेनरचे दरवाजे उघडून पाहता आतमधील जवळपास २० मोपेड जळालेली पाहून चालकाला धक्का बसला़ त्याला धीर देत पोलीस ठाण्यातील नोंदी आणि आरटीओकडील वाहन तपासणी, पंचनामा आणि विमा कंपनीची प्रक्रिया पार पाडून दिली़ तसेच त्याला चार दिवस मुक्कामाची व्यवस्था करून कायदेशीर प्रक्रिया पार पाडून दिली़ सोमवारी सायंकाळी जळीतग्रस्त वाहनाला मार्गस्थ केले़ मोटार मालक संघाच्या माणुसकीला पाहून तो गहिवरून गेला.
परराज्यातील बरीच वाहने ही सोलापुरात आल्यानंतर थोडी भरकटतात, याचा अनुभव मी अनेकदा घेतला आहे़ शहराचा थांबलेला रिंगरुट, खराब रस्ते, पोलीस आणि प्रशासनाकडून मिळणारी वागणूक, चोºयामाºयाचे प्रकार पाहता येथून जाताना बहुतांश मोठी वाहने सोलापूर हद्दीत थांबायला घाबरतात़ त्यांना शहराबाहेर थांब्यासाठी जागा मिळावी म्हणून मोटार मालक संघटना पाठपुरावा करत आहे़
- प्रकाश औसेकर
सचिव, मोटार मालक संघ